फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
महाराष्ट्र राजकारण

करमाळा विधानसभेसाठी शरद पवार गटाकडून माजी आमदार नारायण पाटील निश्चित

करमाळा विधानसभेसाठी शरद पवार गटाकडून माजी आमदार नारायण पाटील निश्चित

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील करमाळा विधानसभेसाठी शरद पवार गटाकडून माजी आमदार नारायण पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. आज करमाळा येथे झालेल्या बैठकीत सर्व इच्छुकांसोबत चर्चा करून नारायण पाटील यांना निवडून आणण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना शिंदे गटातून नारायण पाटील यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. करमाळा तालुक्यातून मोहिते पाटील यांना मोठा लीड मिळवून देणाऱ्या नारायण पाटील यांना आता तिकिटाचं बक्षीस मिळालं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत गुरुवारी नारायण पाटील यांनी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं सोलापूर शहर आणि ग्रामीणमधील विधानसभा मतदारसंघात इच्छुकांची मतं जाणून घेतली. यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, जिल्हाध्यक्ष बळीराम साठे उपस्थित होते.

करमाळ्यातून माजी आमदार नारायण पाटील यांना आपल्याला निवडून आणायचं आहे. त्यामुळे त्यांच्या विजयासाठी कामाला लागा, असा आदेशच जयंत पाटील यांनी करमाळ्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना दिला. जयंत पाटील यांनी पक्षाच्या बैठकीतच नारायण पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा केल्यानं नारायण पाटील यांच्या विधानसभा उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष संजयमामा शिंदे यांच्याकडून नारायण पाटील यांचा निसटत्या मतांनी पराभव झाला होता. नारायण पाटील हे धनगर समाजाचे नेते असून करमाळा तालुक्यात धनगर समाजाची मोठी ताकद आहे.

नारायण पाटील हे मोहिते पाटील यांचे खंदे समर्थक मानले जातात

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"