काळेवाडीत उसनवारीच्या पैशावरून तरुणाचा खून; दोघे अटकेत

पिंपरी: उसनवारिचा पैशावरून वाद होऊन एका व्यक्तीने एका तरुणाचा तीक्ष्ण हत्याराने वार करून खून केला. ही घटना मंगळवार 24 फेब्रुवारी रोजी रात्री सव्वा अकराच्या सुमारास लकी बेकरी चौक, काळेवाडी येथे घडली . हाशिम सईद राईन (वय 24) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

याबाबत अरबाज सईद राईन (वय 22, रा. विजयनगर, काळेवाडी, मूळ रा. गौराचौकी, ता. मनकापुर ,जि. गौडा, उत्तर प्रदेश) यांनी काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी सद्दाम मुमताज राईन (वय 34 ),शरीफ अली खान उर्फ जर्सी पठाण (वय 30, दोघेही रा. कापसे चाळ, लकी बेकरी जवळ, विजय नगर, काळेवाडी, मूळ नगरा, ता. रसडा जि. बलिया, उत्तर प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी व फिर्यादीचा चुलत भाऊ रात्री जेवण करून घरी जात असताना फिर्यादी व फिर्यादीच्या चुलत भावाला अडवून फिर्यादीच्या चुलत भावाकडे आरोपी क्रमांक एक याने असलेल्या पैशाचे कारणावरून भांडण केले. आज इसने पैसे नही दिये, तो इसका मर्डर करने का असे बोलून धक्काबुक्की केली. त्यावेळी फिर्यादी मध्ये पडला असता त्यालाही मारहाण करण्यात आली. फिर्यादीचा मयत भाऊ हाशिम सईद राईन (वय 24), अशपाक व मामा उमर हे भांडण सोडवण्यासाठी आले असता आरोपी क्रमांक दोन याने त्याचे कडील चाकूने फिर्यादीच्या डाव्या डोळ्याचेवर वार केला. फिर्यादीचा भाऊ मयत इसम हा फिर्यादीस वाचवण्यात आला असता आरोपी क्रमांक एक याने मयत व्यक्तीस पकडले व आरोपी क्रमांक दोन याने त्याच्याकडील चाकू फिर्यादीच्या भावाच्या छातीत मारून त्यास जीवे ठार मारले. काळेवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मेटे पुढील तपास करत आहेत.

