लिफ्ट वापरण्याच्या वादातून तरुणास मारहाण!

पिंपरी: लिफ्ट वापरण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका तरुणास फावड्याने मारहाण करून जखमी केले. याप्रकरणी दोन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवार दिनांक 21 डिसेंबर रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास त्रिवेणी नगर निगडी परिसरात घडली.

गणेश गायकवाड आणि एक महिला आरोपी (दोघेही रा. एस. आर. ए बिल्डींग , शरद नगर, निगडी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. रामलिंग रावसाहेब सुकळे (वय 23, फ्लॅट नंबर 509, शरद नगर निगडी )असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून त्यांनी सोमवारी दिनांक 22 रोजी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रविवारी दुपारी साडेचार च्या सुमारास फिर्यादी लिफ्टने जात असताना आरोपी गणेश गायकवाड याने फिर्यादी यांना लिफ्टमध्ये येण्यास विरोध करीत शिवीगाळ करत वाद घातला. घडलेल्या घटनेबाबत फिर्यादी ते सांगण्यासाठी आरोपीच्या घरी गेले असता महिला आरोपीने फिर्यादी यांना शिवीगाळ करीत पकडून ठेवले .त्यानंतर आरोपी गणेश गायकवाड याने प्लास्टिक पाईपने फिर्यादीच्या पाठीवर व हातावर मारहाण केली. तसेच फावड्याने मारहाण केल्याने फिर्यादी हे गंभीर जखमी झाले. लिफ्टच्या वादातून तरुणास मारहाण

