फक्त मुद्द्याचं!

19th April 2025
गुन्हेगारी

तरुणाने मेट्रो स्टेशनवरून उडी मारून केलीआत्महत्या !

तरुणाने मेट्रो स्टेशनवरून उडी मारून केलीआत्महत्या !

पिंपरी पोलिसांकडून दोघांना अटक
पिंपरी : एक ॲप्लिकेशनच्या माध्यमातून ओळख झाल्यानंतर सहा तरुणांनी एका तरुणाला पिंपरी येथे भेटण्यासाठी बोलावले. तिथे त्याचे नग्न व्हिडिओ, फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत त्याच्याकडून पैसे घेत त्याला त्रास दिला. या त्रासाला कंटाळून तरुणाने मेट्रो स्टेशनवरून उडी मारून आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

सुजल सुनील मनकर (वय २१) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सुजल याचे वडील सुनील बाजीराव मनकर (४७, रा. राजगुरूनगर, ता. खेड) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रणव किशोर शिंदे (वय २१), नितीन पाटील (२२), संदीप रोकडे (२०), आकाश चौरे (२०, चौघे रा. महेशनगर पिंपरी. मूळ रा. धुळे), लोपेश राजू पाटील (२०, महेशनगर, पिंपरी. मूळ रा. पातोंडा, जळगाव), प्रथमेश परशुराम जाधव (१९, महेशनगर, पिंपरी. मूळ रा. सातारा) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. संशयित लोपेश पाटील आणि प्रथमेश जाधव यांना पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक ॲप्लिकेशनच्या माध्यमातून संपर्क करून संशयित सहा जणांनी मिळून सुजल याला महेशनगर पिंपरी येथे बोलावून घेतले. तिथे तरुणाचे नग्न फोटो आणि व्हिडिओ काढले. ते फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन सुजल याच्याकडे ५० हजार रुपयांची मागणी केली. त्यातील ३५ हजार ५०० रुपये सुजल याने संशयिताना दिले. मात्र आणखी पैशांची मागणी करत संशयितांनी सुजल याला मानसिक त्रास दिला. या त्रासाला कंटाळून सुजल याने संत तुकाराम नगर मेट्रो स्थानकावरून उडी मारून आत्महत्या केली. पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली असून पोलिस उपनिरीक्षक चिरंजीव दलालवाड पुढील तपास करीत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"