यशश्री स्टील मालकाने बांधकाम कंपनीची केली 8 लाख 29 हजाराची फसवणूक!

पिंपरी : बांधकाम साईट करिता वीस टन स्टीलची ऑर्डर देऊन फक्त पाच टन स्टील पाठवून आठ लाख 29 हजार 452 रुपयांची फसवणूक केली. ही घटना 14 ऑक्टोबर 2025 पासून आज पर्यंत ट्रू रियालिटी कंपनी उत्तम नगर बावधन येथे घडली.

याबाबत प्रशांत प्रकाश कदम रा. बावधन बुद्रुक, ता. मुळशी यांनी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे . यशश्री स्टीलचे मालक जावेद तांबोळी (रा. ससाणे नगर, हडपसर )व एक महिला अशी आरोपींची नावे आहेत .त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी क्रमांक एक व दोन यांनी फिर्यादी यांचे बांधकाम साईट करिता सुमारे 20 टन स्टीलची ऑर्डर दिली. त्याची एकूण किंमत (जीएसटी सहित) 10 लाख 66 हजार 189 रुपये इतकी होती. मे. यशस्वी स्टील यांनी वेळेत स्टील सप्लाय होईल असे सांगून फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला. फिर्यादी यांनी आरटीजीएस द्वारे आरोपी क्रमांक एक यांना दहा लाख 66 हजार 189 रुपये पाठवले . आरोपींनी 6 नोव्हेंबर 2025 रोजी 20 टनापैकी फक्त पाच टन स्टील कंपनीला पाठवले .उर्वरित पंधरा टन स्टीलची किंमत 8 लाख 29 हजार 452 इतकी आहे. त्याबाबत विचारणा केले असता त्यांनी स्टील पाठवण्यास टाळाटाळ केली. आज देतो उद्या देतो असे सांगून पैसे परत दिले नाहीत. आरोपी क्रमांक एक याने जनसेवा सहकारी बँक हडपसर या बॅकेचा धनादेश दिला. तो बँकेत वटला नाही. त्यामुळे फिर्यादी यांना आपली फसवणूक केल्याचे समजून आले .त्यांनी याबाबत तक्रार दिली. बावधन पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक ठाकरे हे पुढील तपास करत आहेत.

