महिला आयोग आपल्या दारी या उपक्रम: रूपाली चाकणकर

पुणे जिल्ह्यातील तक्रारीची जन सुनावणी 15 ते 17 एप्रिल या कालावधीत
पुणे : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून महिला आयोग आपल्या दारी या उपक्रमांतर्गत पुणे जिल्ह्यातील तक्रारीची जन सुनावणी 15 ते 17 एप्रिल या कालावधीत होणार आहे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे अध्यक्षा श्रीमती रूपाली चाकणकर या तीन दिवस पुणे जिल्हा दौरा करणार आहेत.
पुणे शहरातील तक्रारीची सुनावणी मंगळवार 15 एप्रिल रोजी, पुणे ग्रामीण साठी बुधवार 16 एप्रिल रोजी जन नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे सकाळी 11 वाजता होणार आहेत. तर गुरुवार 17 एप्रिल रोजी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहात जन सुनावणी आयोजित करण्यात आली आहे. जिल्ह्यातील जन सुनावणीत महिलांनी पुढे येऊन न घाबरता आपल्या तक्रारी महिला आयोगासमोर मांडाव्यात असे आव्हान चाकणकर यांनी केले आहे.

जन सुनावणीत महिला राज्य आयोग आयोगाच्या अध्यक्ष श्रीमती चाकणकर आणि सदस्य श्रीमती नंदिनी आवडे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या जनसुनावणीला जिल्हाधिकारी ,महापालिका आयुक्त, पोलीस प्रशासन आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. महिला आयोग आपल्या दारी या उपक्रमाबाबत आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती चाकणकर म्हणाल्या, महाराष्ट्र राज्य महिला आयोग महिलांच्या सक्षमीकरणासाठी अविरत कार्यरत आहे .राज्याच्या कानाकोपऱ्यातील महिलांना मुंबईत येऊन तक्रार करणे प्रत्यक्ष सुनावणी उपस्थित राहणे आर्थिक दृष्ट्या व इतर कारणांमुळे शक्य होत नाही, त्यामुळे आयोग जिल्हास्तरावर जात आहे 15 ते 17 एप्रिल महिला आयोग आपल्या दारी हा उपक्रम राबववित आहे असे त्यांनी सांगितले.