नाव ,नोकरीची खोटी माहिती देऊन लग्नाचे आमीष दाखवून महिलेची फसवणूक!

पिंपरी : इस्त्रो कंपनीत वैज्ञानिक पदावर नोकरी करीत असल्याचे सांगून एका महिलेला लग्नाचे आमीष दाखवून वेळोवेळी 42 लाख 64 हजार 32 रुपये घेऊन फसवणूक केली. ही घटना 17 नोव्हेंबर 2024 ते 30 जानेवारी 2025 या कालावधीत सिल्वर टीवी डेक्स, फ्लॅट नंबर 402, ए व्ही नियर डी कॅथोलोन मॉल ताथवडे येथे घडली.

याप्रकरणी एका महिलेने सायबर क्राईम पोर्टलवर ऑनलाईन तक्रार केली आहे. आदर्श प्रशांत म्हात्रे उर्फ जयेश पाटील (वय 36, रा कवडे, हाशिवरे कुरूळ ,आरपीएफ कॉलनी, अलिबाग, रायगड )असे आरोपीचे नाव आहे
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार.आरोपीने जीवनसाथी डॉट कॉम वेबसाईटवर जयेश पाटील या खोट्या नावाचे प्रोफाइल तयार करून फिर्यादी यांना रिक्वेस्ट पाठवली. आपण इस्रो कंपनीमध्ये वैज्ञानिक या पदावर नोकरी करीत असून रसायनी, नवी मुंबई ,रायगड येथे असल्याचे खोटे सांगितले. फिर्यादी यांच्यासोबत संपर्क वाढवून विश्वास संपादन केला. लग्नाचे आमीष दाखवून वेळोवेळी फिर्यादी कडून 42 लाख 64 हजार 32 रुपये घेऊन फसवणूक केली. फिर्यादीने सायबर क्राईम पोर्टलवर ऑनलाईन आरोपीची तक्रार केल्यानंतर आरोपीने फिर्यादीला फसवणूक झालेल्या रकमेपैकी 16 लाख 64 हजार 32 रुपये परत दिले. मात्र उर्वरित 27 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. याबाबत वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस निरीक्षक गुन्हे पाटील अधिक तपास करत आहे.

