फक्त मुद्द्याचं!

30th March 2026
गुन्हेगारी

मेफेड्रोन व कोकेन विक्री;एका महिलेस अटक!

मेफेड्रोन व कोकेन विक्री;एका महिलेस अटक!

  पिंपरी : अमली पदार्थ मेफेड्रोन व कोकेन असा माल बेकायदेशीररित्या विक्रीकरिता जवळ बाळगल्याने एका महिलेस अटक करण्यात आली आहे. ही घटना सोमवार 9 फेब्रुवारी रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास काशीद पार्क, स्कोडा शोरूम समोर, सार्वजनिक रोडवर, पिंपळे गुरव येथे घडली.

याबाबत आशिष ज्ञानदेव बनकर पोलीस हवालदार सांगवी पोलीस स्टेशन यांनी सांगली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे .याप्रकरणी 64 वर्षीय महिले विरोधात व या महिलेला माल पुरविणारा शाहिद रा. इन ऑर्बिट मॉल समोर, मालाड मुंबई यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महिलेने विक्रीसाठी 11.450 ग्रॅम मेफेड्रोन व 9.73 ग्रॅम कोकेन असा एकूण दोन लाख 60 हजार रुपये किमतीचा माल बेकायदेशीरपणे विक्रीसाठी जवळ बाळगला. आरोपी महिलेने हा माल आरोपी क्रमांक दोन यांच्याकडून आणला असल्याचे सांगितले. सांगवी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नांदेकर गुन्हे हे तपास करत आहे.

viara vcc
viara vcc

हातभट्टीवर मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचा छापा!
पिंपरी : विनापरवाना हातभट्टी दारू तयार करण्यासाठी लागणारे सहा लाख 50 हजार रुपये किमतीचे तेरा हजार लिटर गुळ मिश्रित कच्चे रसायन पोलीस छाप्यात मिळून आले. ही कारवाई बुधवार 11 फेब्रुवारी रोजी परी दीड वाजण्याच्या सुमारास आरगडे वस्ती, पवना नदीकाठी, शिरगाव येथे करण्यात आली.

याबाबत नितीन नामदेवराव उंब्रजकर पोलीस हवालदार, मालमत्ता गुन्हे विरोधी पथक, गुन्हे शाखा यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात एका महिलेविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी महिलेने विनापरवाना सहा लाख रुपये किमतीचे 13000 लिटर गूळ मिश्रित कच्चे रसायन हातभट्टी दारू तयार करण्यासाठी भिजत घालत असताना पोलिसांनी छापा टाकला.आरोपी घटनेच्या जागेवरून पळून गेली. आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरगाव पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार सोनटक्के हे पुढील तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"