भोसरी एमआयडीसीत गांजा विक्री करणाऱ्या महिलेला अटक!

२ लाख ८२ हजारांचा गांजा जप्त
पिंपरी : भोसरी एमआयडीसीत गांजा विक्री करणाऱ्या एका महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. या महिलेकडून २ लाख ८२ हजार रुपये किंमतीचा पाच किलो ८०० ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला आहे. ही कारवाई एमआयडीसी भोसरी पोलिसांनी शनिवारी (दि.२९) केली आहे.
या प्रकरणी एमआयडीसी भोसरी येथे राहणाऱ्या ३९ वर्षीय महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार रवी नाडे यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमआयडीसी भोसरी मधील सेक्टर नंबर १२ येथे एक महिला गांजा विक्रीसाठी आल्याची माहिती एमआयडीसी भोसरी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतले. तिच्याकडून २ लाख ८२ हजार रुपये किमतीचा ५ किलो ८०० ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.