फक्त मुद्द्याचं!

10th March 2026
गुन्हेगारी

भरधाव टेम्पो चालवत सहा वाहनांना दिली धडक; महिला अटकेत

भरधाव टेम्पो चालवत सहा वाहनांना दिली धडक; महिला अटकेत

पिंपरी : वाहन चालवण्याचा परवाना नसलेल्या अल्पवयीन मुलाने भरधाव टेम्पो चालवत सहा वाहनांना धडक दिली. या अपघातात वाहनांचे नुकसान झाले असून तीन जण जखमी झाले. ही घटना काळेवाडी फाटा सिग्नल येथे रविवार आठ मार्च रोजी सकाळी पावणेदहाच्या सुमारास घडली .याप्रकरणी एका महिलेला अटक करण्यात आली आहे तर अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

viara vcc
viara vcc

तापकीर चौक काळेवाडी येथे राहणाऱ्या एका सतरा वर्षीय मुलासह टेम्पो मालक असलेल्या महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .मनीष कुमार शंभुनाथ ठाकूर (वय 35, रा. साई कॉलनी नंबर एक, नखाते वस्ती, रहाटणी) यांनी याबाबत काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वाहन चालवण्याचा परवाना नसलेल्या अल्पवयीन आरोपीने त्याच्या ताब्यातील टेम्पो भरधाव चालवत वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष केले. एक मोटरसायकल, कार आणि रिक्षासह एकूण सहा वाहनांना त्याने धडक दिली. या अपघातात तीन जण जखमी झाले असून वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अल्पवयीन मुलाकडे वाहन चालवण्याचा परवाना नसताना आणि त्याच्याकडून अपघात होण्याची शक्यता असताना त्यास टेम्पो चालवण्यास दिल्यामुळे एका महिलेविरोधातही गुन्हा दाखल करीत, त्या महिलेला अटक करण्यात आली आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"