विन अड्डा; बेटिंग वेब पोर्टलवर छापा!

पिंपरी : विन अड्डा या नावाचे प्रतिबंधित केलेले बेटिंग वेब पोर्टल द्वारे बुकीच्या आर्थिक फायद्या करता विनापरवाना ऑनलाइन जुगार खेळवताना ऑनलाईन जुगाराचे तीन लाख एक हजार रुपये किमतीचे साहित्य जप्त करण्यात आले. ही कारवाई बुधवार 21 जानेवारी रोजी रात्री पावणे अकराच्या सुमारास फ्लॅट नंबर 107, बी विंग आर सात ,लाइफ रिपब्लिक सोसायटी, कोलते पाटील, मारुंजी येथे घडली.

या प्रकरणी तुषार अशोक शेटे पोलीस हवालदार, गुन्हे शाखा युनिट दोन, पिंपरी चिंचवड यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. प्रणय मनोहर जांभुळे (वय 26 ),दुर्गेश गणेशराम छेदया (वय 20), सुनील कुमार शैलेश भाई चौधरी (वय 28), सारंग बालाजी डफ (वय 25) मुकेश कुमार खुशेराम (वय 27) अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी क्रमांक एक ते पाच यांनी या नावाचे प्रतिबंधित केलेले बेटिंग पोर्टल द्वारे बुकीच्या फायद्या करिता विनापरवाना ऑनलाइन जुगार खेळवताना लागणारे जुगाराचे तीन लाख एक हजार रुपये किमतीचे साहित्य पोलिसांनी ताब्यात घेतले.
ऑनलाइन जुगारसाठी वापरण्यात आलेले बनावट बँक खाते तयार करून सिम कार्ड घेऊन त्याद्वारे सदर बँक खाते धारकांची ओळख वापरून लॅपटॉप व मोबाईल द्वारे त्यांचा पासवर्ड घेऊन बनावट कागदपत्रांच्या आधारे बँक खाते उघडले. वेब लॉगीन द्वारे अकाउंट मध्ये वेळोवेळी पैसे ट्रान्सफर करून लोकांची फसवणूक केली. याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक कांदे हे पुढील तपास करत आहेत.

