फक्त मुद्द्याचं!

17th April 2025
अर्थकारण

मध्यमवर्गीयांसाठी अच्छे दिन!

मध्यमवर्गीयांसाठी अच्छे दिन!

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाचा २०२५ – २०२६ या वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी मध्यमवर्गाला मोठी भेट दिली आहे. १२ लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्या लोकांना एक रूपायाही टॅक्स लागू होणार नाही, अशी घोषणा अर्थमंत्र्‍यांनी केली आणि मध्यमवर्गाला मोठा दिलासा मिळाला.

आतापर्यंत १२ लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्या नोकरदारांना साधारणपणे ७१ हजार ५०० रुपये कर भरावा लागत होता. आता नवीन करप्रणाली लागू झाल्यानंतर १३ लाख रुपये उत्पन्न असल्यास ६६ हजार ३०० रुपये कर भरावा लागले. पूर्वी तो ८८ हजार ४०० रुपये इतका भरावा लागत होता. म्हणजेच करदात्यांना आता २२ हजार १०० रुपये एतका फायदा होणार आहे. वार्षिक उत्पन्न १५ लाख रुपये असणाऱ्यांना १.३० लाख रुपये टॅक्स भरावा लागत होता. आता नवीन स्लॅबनंतर तो ९७ हजार ५०० रुपये इतकाच भरावा लागेल. तसेच ज्यांचे वार्षिक उत्पन्न १७ लाख आहे त्यांना सध्याच्या करप्रणाली नुसार १.३० लाख रुपये भरावा लागेल. पूर्वी या करदात्यांनी १.८४ लाख रुपये कर भरला आहे.

वार्षिक २२ लाख रुपये उत्पन्न असलेल्यांना २,४०,५०० रुपये कर भरावा लागेल. तर वार्षिक २५ लाख रुपये उत्पन्न असलेल्यांना ४ लाख ३४ हजार २०० रुपये इतका कर भरावा लागेल.

आता २४ लाख रुपयांच्या उत्पन्नावर ३० टक्के कर आकारला जाणार आहे. ७५ हजार रुपयांपर्यंत स्टँडर्ड डिडक्शनची सूट असेल. तसेच, १५-२० लाख रुपयांच्या उत्पन्नावर २० टक्के कर लागेल. ८ ते १२ लाख रुपयांच्या उत्पन्नावर १० टक्के आयकर लागेल.उल्लेखनीय आहे की गेल्या अर्थसंकल्प २०२४ मध्ये, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मानक कपातीची मर्यादा वाढवून नवीन कर प्रणालीमध्ये मोठी भेट दिली होती. ही मर्यादा ५० हजार रुपयांवरून ७५ हजार रुपये करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा नवीन टॅक्स स्लॅबमध्ये मध्यमवर्गीयांना दिलासा देण्यासाठी मोठा बदल करण्यात आला आहे.
बदलानंतर नवीन करप्रणाली –

शून्य ते ४ लाखापर्यंत – ०%
३ ते ८ लाख – ५% , ८-१२ लाख -१०% ,१२-१६ लाख – १५% ,१६-२० लाख – २०% ,२०-२४ लाख: २५% ,२४ लाखांहून जास्त – ३०%

वैद्यकीय पर्यटनवाढीसाठी व्हिसासाठीचे नियम सोपे करणार
व्हिसासाठीचे नियम सोपे करणार असून LIVE व्हिसाची पद्धत आणखी सोपी होणार आहे. भारतात उपचार घेऊ इच्छिणाऱ्यांना सहज व्हिसा मिळणार. काही पर्यटक गटांसाठी व्हिसा शुल्क माफीसह सरकार सुव्यवस्थित ई-व्हिसा सुविधा सुरू करणार आहे. क्षमता वाढवणे आणि सुलभ व्हिसा नियमांसह खासगी क्षेत्रासह भागीदारीत भारतात वैद्यकीय पर्यटन आणि उपचारांना प्रोत्साहन दिले जाईल

उडान योजनेत सुधारणा
“उडान योजनेत सुधारणा करण्यात येणार असून याअंतर्गत 120 नवीन गंतव्यस्थानांशी प्रादेशिक कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठी आणि प्रवास करण्यासाठी सुधारित उडान योजना सुरू केली जाईल. येत्या 10 वर्षात बिहारमधील ग्रीनफिल्ड विमानतळांवरून कोटी अतिरिक्त प्रवाशांची पूर्तता होईल राज्याच्या भविष्यातील गरजा.1.5 कोटी मध्यमवर्गीय लोकांना जलद प्रवासासाठी त्यांच्या आकांक्षा पूर्ण करण्यास सक्षम केले आहे. या योजनेने 88 विमानतळे जोडली आहेत आणि 619 मार्ग कार्यान्वित केले आहेत. “

कापूस उत्पादकतेसाठी मिशन
या मिशन अंतर्गत शेतकऱ्यांचे उत्पन्न सुधारून भारताच्या पारंपारिक कापड क्षेत्राला नवसंजीवनी देण्यासाठी दर्जेदार कापसाचा स्थिर पुरवठा सुनिश्चित करण्यात येईल. कापूस शेतीची उत्पादकता आणि शाश्वतता लक्षणीयरीत्या सुधारण्यासाठी ५ वर्षांचे मिशन राबवण्यात येणार आहे. अतिरिक्त-लांब मुख्य कापूस वाणांना प्रोत्साहन देण्यात येईल

जलजीवन मिशनचा विस्तार
भारतातील 80 टक्के ग्रामीण लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 15 कोटी कुटुंबांना पिण्यायोग्य नळाच्या पाण्याची जोडणी उपलब्ध करून देण्यात आली आहे. 100 टक्के कव्हरेज प्राप्त करण्यासाठी, एकूण परिव्यय वाढीसह 2028 पर्यंत या मिशनचा विस्तार. शाश्वतता आणि नागरिक-केंद्रित पाणी सेवा वितरण सुनिश्चित करण्यासाठी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसोबत स्वतंत्र MOU किंवा स्वतंत्र MOU वर स्वाक्षरी केली जाईल.

Written By
टीम फक्त मुद्याचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"