पवना, मुळशी,खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविला!

पुणे, मुंबईसह २६ ऑगस्टपासून पुढील काही दिवस पावसाचे प्रमाण वाढण्याचा अंदाज
पुणे : कोकण व पुणे, नाशिक, सातारा घाटमाथ्यावरील जिल्ह्यांत अधिक पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवविला आहे. पवना, मुळशी,खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसास सुरुवात झालेली असल्याने पवना, मुळा आणि मुठा नदी पात्रात धरणातील पाण्याचा विसर्ग वाढविण्यत आला आहे. नागरिकांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

पवना धरण 100% भरले
पवना नदी काठच्या सर्व नागरीकांना सूचित करण्यात येत आहे, की सद्यस्थितीमध्ये पवना धरण 100% भरलेले आहे. पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसास सुरुवात झालेली आहे. धरणातील पाणीसाठा नियंत्रित करणेकरिता आज रात्री 20:30 वाजेपर्यंत नदीपात्रामध्ये 2500 क्युसेक विसर्ग करण्यात येणार आहे. पाणलोट क्षेत्रातील पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानुसार धरणातून नदीपात्रात होणारा विसर्ग टप्प्याटप्प्याने कमी किंवा जास्त केला जाऊ शकतो असे सांगण्यत आले आहे.
मुळशी धरण ९९.८३ % भरले
मुळशी धरण ९९.८३ % भरले आहे व पाऊस कमी अधिक प्रमाणात होत आहे आणि पाणी पातळीत वाढ होत आहे. मुळशी धरणाच्या सांडव्यातून मुळा नदीत 2500 Cusecs ने सुरू असणाऱ्या विसर्गामध्ये वाढ करून सायंकाळी 8:०० वाजता 11700 Cusecs करण्यात आला., तसेच पाऊस चालूवाढत राहिल्यास व येवा वाढत गेल्यास परिस्थितीनुसार विसर्ग कमी जास्त करण्यात येईल असे सुरेश कोंडूभैरी.( टाटा पॅावर ,मुळशी धरण ) यांनी कळविले आहे.
खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा 3366 क्युसेक वाढवून संध्याकाळी 05.00 वा. 6515 क्यूसेक करण्यात येत आहे. आवश्यकतेनुसार बदल संभवू शकतो. पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग पुन्हा कमी जास्त करण्याची शक्यता आहे.- मोहन शां.भदाणे उपविभागीयअभियंता, मुठा कालवे पाटबंधारे उपविभाग,
तरी सर्वांना याद्वारे विनंती करण्यात येते की कृपया नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदीपात्रात तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत. कृपया सखल भागातील संबंधित नागरिकांना सूचना देण्यात याव्यात व सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी.
मेघगर्जनेसह व विजेच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाने यंदा महाराष्ट्रात गणरायाचे आगमन होण्याची शक्यता आहे. पश्चिम झारखंडमध्ये आधीच एक कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून पुढील ३६ तासांत उत्तर-पश्चिम बंगालच्या उपसागरात आणखी एक कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात (पुणे, मुंबईसह) २६ ऑगस्टपासून पुढील काही दिवस पावसाचे प्रमाण वाढण्याचा अंदाज आहे. पुणे शहरात सर्वसाधारणपणे ढगाळ वातावरण राहून हलका ते ठिकठिकाणी मध्यम पावसाच्या सरी पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मुंबईत मध्यम पावसाबरोबरच ठिकठिकाणी जोरदार पाऊस पडू शकतो. ऑगस्ट अखेरपर्यंत मधूनमधून पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे.