फक्त मुद्द्याचं!

19th April 2025
पुणे

आषाढी पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना सर्व सोयी सुविधा मिळाव्यात: जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

आषाढी पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना सर्व सोयी सुविधा मिळाव्यात: जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

पुणे : आगामी आषाढी वारी पालखी सोहळ्यासाठी पाणी स्वच्छता वाहतूक व्यवस्था रस्ते रस्ता सुरक्षा आरोग्य सुविधा आधी सर्व सोयी सुविधा योग्य पद्धतीने उपलब्ध करून देण्यासह पालखी सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी आजपासूनच नियोजन करावे वारकऱ्यांना कोणतीही असुविधा होणार नाही याची दक्षता घ्यावी असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी यांनी दिले श्री क्षेत्र आळंदी व श्री क्षेत्र देहू ते पंढरपूर आषाढी वारी पालखी सोहळा नियोजनाबाबत आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी डुडी बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस उपायुक्त बापू बांगर श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान समितीचे प्रमुख विश्वस्त एडवोकेट राजेंद्र उमाप जगतगुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष ह भ प जालिंदर महाराज मोरे आदी या बैठकीस उपस्थित होते .
पालखी सोहळा जून महिन्यात सुरू होणार आहे. पालखी सोहळा नियोजनाच्या अनुषंगाने यंत्रणाना तयारी करण्यासाठी पुरेसा कालावधी मिळावा ,यासाठी ही आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. श्री क्षेत्र आळंदी व श्री क्षेत्र देहू संस्थांच्या वतीने करण्यात येणाऱ्या सूचनावर सकारात्मक चर्चा करून तोडगा काढण्यात येईल असे जिल्हाधिकारी डुडी यांनी सांगितले .बैठकीदरम्यान आलेल्या सूचनांचा निर्देशांकानुसार कार्यवाहीचा अहवाल संबंधित यंत्रणांनी मे महिन्यातील पुढील बैठकीत सादर करावा. आरोग्य सुविधा ,शौचालय पाणीपुरवठा ,आदी सर्व सुविधा गतवर्षीपेक्षा मोठ्या प्रमाणात वाढवण्यात येतील अशी ग्वाही डुडी यांनी दिली.

यंदाच्या वारीत मोठ्या प्रमाणात फिरती ई- टॉयलेट्स ठेवण्यात येणार आहेत. त्यांची स्वच्छता, तेथे पाण्याचा पुरवठा होत आहे किंवा कसे, आधीदी सह नियंत्रण करण्याची वेगळी व्यवस्था व पथक नेमण्यात येणार आहे .त्याचे एक मोबाईल ॲप देखील तयार करण्यात येणार असून या मोबाईल स्वच्छतागृहे ठेवण्यात येणाऱ्या ठिकाणी क्यू आर कोड लावण्यात येणार आहेत. त्यामुळे अस्वच्छ स्वच्छतागृहांची छायाचित्रे काढून अपलोड करता येतील ती प्रशासनास प्राप्त होतील व त्यानुसार स्वच्छतेबाबतचे नियोजन तात्काळ करणे शक्य होणार आहे .
आळंदी येथील दर्शन वारीच्या निमित्ताने जमीन आरक्षण, पालखी मार्गस्थ असताना वाहतूक कोंडी होऊ नये, स्वागतासाठी लावण्यात येणारे ध्वनी शेपक, ध्वनीवर्धक, पालखी मार्गस्थ असताना तसेच पाण्याचे टँकर भरण्याच्या ठिकाणी अखंड वीजपुरवठा ,भारतीय राष्ट्रीय रस्ते प्राधिकरणाने पालखी महामार्गाची अपूर्ण कामे पूर्ण करून घेणे ,सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार क्षेत्रातील रस्त्यांची करणे, पालखी सोहळ्यात समन्वय साधण्यासाठी प्रांताधिकार्‍याची नेमणूक करण्यात येईल अशा सूचना डुडी यांनी केल्याआहेत .

viara ad
viara ad

या आढावा बैठकीस जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे विश्वस्त विक्रम सिंह मोरे, वैभव मोरे, श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान समितीचे विश्वस्त डॉक्टर भावार्थ देखणे, पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजन नाथ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बाप्पा बहिर, पुणे शहराच्या प्रांताधिकारी स्नेहा किसवे- देवकाते ,खेड प्रांताधिकारीअनिल दौंडे, हवेलीचे प्रांताधिकारी यशवंत माने, दौंड प्रांताधिकारी मिनाज मुल्ला ,पुरंदरच्या प्रांताधिकारी वर्षा लांडगे ,वारकरी महामंडळ उपाध्यक्ष डी डी भोसले पाटील संबंधित तालुक्याचे तहसीलदार ,महापालिका, नगरपरिषदा, आरोग्य विभाग ,पोलीस एन डी आर एफ, अग्निशामक विभाग, पशुसंवर्धन विभाग ,परिवहन विभाग ,राज्य मार्ग परिवहन महामंडळ आदी विकामे,भागाचे अधिकारी उपस्थित होते.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"