फक्त मुद्द्याचं!

28th April 2025
महाराष्ट्र

अब्दुल सत्तार यांच्या अडचणी वाढणार? शपथपत्रात तब्बल १६ चुका !

अब्दुल सत्तार यांच्या अडचणी वाढणार? शपथपत्रात तब्बल १६ चुका !

निवडणूक आयोगाकडे पुराव्यासह तक्रार
छत्रपती संभाजीनगर : एकनाथ शिंदे गटाचे सिल्लोड येथील उमेदवार अब्दुल सत्तार यांनी उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या शपथपत्रात तब्बल १६ गंभीर प्रकारच्या चुका असल्याची तक्रार पुराव्यानिशी निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. सत्तार यांनी शपथपत्रात मालमत्ता, चारचाकी वाहन, हिऱ्यांच्या दागिन्यांबद्दल धडधडीत खोटी माहिती दिल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरपेल्ली आणि डॉ. अभिषेक हरिदास यांनी निवडणूक आयोगाकडे केलेल्या तक्रारीत केला आहे. त्यामुळे सत्तार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

अब्दुल सत्तार यांनी शपथपत्रात दाखवलेल्या मालमत्तेचा तपशील आणि प्रत्यक्ष मालमत्ता यामध्ये प्रचंड तफावत आहे. अनेक मालमत्तांचे क्षेत्रफळ हे चुकीचे दाखवण्यात आले आहे. तसेच मालमत्तेवर करण्यात आलेल्या बांधकामाच्या गुंतवणुकीची माहितीदेखील दाखवण्यात आली नसल्याचे या आरोपात म्हटले आहे. काही मालमत्ताची माहिती शपथपत्रातून गायब करण्यात आली आहे.

विविध सहकारी संस्थांमध्ये सत्तार यांचे शेअर्स आहेत. मात्र, या शेअर्सची खोटी माहिती देण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरपेल्ली आणि डॉ. अभिषेक हरिदास यांनी निवडणूक निर्णय अधिकारी लतीफ पठाण यांच्याकडे पुराव्यानिशी सत्तार यांच्या शपथपत्राविरोधात तक्रार केली आहे.

२०१९च्या विधानसभा निवडणुकीतही सत्तार यांनी शपथपत्रात अनेक गोष्टी लपवून निवडणूक आयोगाची फसवणूक केली होती. यासंदर्भात सिल्लोड न्यायालयात फौजदारी याचिका दाखल करण्यात आली होती. याप्रकरणी न्यायालयाने सत्तारांना समन्स बजावले होते. मात्र हे प्रकरण अद्याप सुनावणीसाठी प्रलंबित आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"