फक्त मुद्द्याचं!

22nd March 2026
गुन्हेगारी

तडीपार आदेशाचे उल्लंघन; तरुणास अटक!

तडीपार आदेशाचे उल्लंघन; तरुणास अटक!

पिंपरी: तडीपार आदेशाचे उल्लंघन करून शहरात आलेल्या तसेच धारदार कोयता बाळगणाऱ्या तरुणास पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई गुरुवार आठ जानेवारी रोजी चिखलीतील भीमशक्ती नगर परिसरात करण्यात आली.

पोलीस हवालदार प्रवीण गंगाराम भोमाळे यांनी याबाबत चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.  विकास लाला गवळी (वय 23, रा. मोरेवस्ती, चिखली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी विकास गवळी याला पुणे जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता तडीपार करण्यात आले आहे. तडीपारीच्या आदेशाचा भंग करून तो कोणतीही परवानगी न घेता शहरात आला होता. तसेच प्रतिबंधात्मक आदेश लागू असताना आरोपी गवळी यांच्याकडे कोयता आढळून आला. चिखली पोलीस तपास करत आहेत.

viara vcc
viara vcc

किरकोळ कारणावरून मारहाण!
पिंपरी: शेतात लघु शंका करण्याच्या कारणावरून तीन जणांनी एका व्यक्तीला बेदम मारहाण करीत जखमी केले. ही घटना मावळ तालुक्यातील नऊ लाख उंबरे या गावात गुरुवारी साडेसहाच्या सुमारास घडली.

नवनाथ बबन शेटे (वय 40 सर्व राहणार नऊ लाख उंबरे, ता. मावळ, जि. पुणे )असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून त्यांनी याबाबत तळेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. राहुल भगवान शेटे (वय 38), प्रमोद भगवान शेटे (वय 35) आणि रुद्राक्ष काळूराम शेटे (वय 18) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी सायंकाळी फिर्यादी यांचा भाऊ हा त्यांच्या घराजवळील मोकळ्या जागेतील शेतात लघुशंका करीत होता. या कारणावरून संतापलेल्या आरोपींनी आपणास संगणमत करून फिर्यादी यांना शिवीगाळ करीत धक्काबुक्की केली. त्यानंतर आरोपींनी बॅट ,लोखंडी पाईप व बांबूने फिर्यादी यांना बेदम मारहाण केली. तसेच आरोपी रुद्राक्ष याने केलेल्या धक्काबुक्कीत फिर्यादी हे गंभीर जखमी झाले.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"