तडीपार आदेशाचे उल्लंघन; एका आरोपीस अटक!

पिंपरी :तडीपार आदेशाचे उल्लंघन करून व प्रतिबंधक नियमाचा भंग करून लोखंडी कोयता बाळगल्याने एका आरोपीस अटक करण्यात आली आहे. ही कारवाई 10 जानेवारी रोजी सायंकाळी पावणे सहाच्या दरम्यान सावित्री बिल्डिंगच्या समोरील मोकळ्या कंपाऊंडमध्ये, ओम शांती रोड, वैभव नगर, पिंपरी येथे घडली.

याबाबत रामदास कुंडलिक मोहिते गुंडा विरोधी पथक, गुन्हे शाखा, पिंपरी चिंचवड यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे .गणेश उर्फ बाळा विलास चव्हाण (वय 23, काळा खडक, वाकड) असे तडीपार आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी गणेश चव्हाण याला नोव्हेंबर 2024 मध्ये पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीतून दोन वर्षाकरिता तडीपार केले आहे.
तरीदेखील कोणतीही परवानगी न घेता आरोपी पिंपरी चिंचवड हद्दीत आढळून आला. याशिवाय त्याच्याजवळ 500 रुपये किमतीचा लोखंडी कोयता सापडला. प्रतिबंधक नियमाचा उल्लंघन केल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी पिंपरी पोलीस पुढील तपास करत आहेत.
रोड रोलर खाली सापडून कामगाराचा मृत्यू
पिंपरी: रस्त्याचे काम सुरू असताना पाठीमागे येणाऱ्या रोड रोलर खाली सापडून कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना आकुर्डीतील गंगानगर येथे शनिवार दहा डिसेंबर जानेवारी रोजी घडली. आकाश शिवा पाथरूड व 31 रा दळवी नगर आकुर्डी असे या अपघातात मृत्यू झालेल्या कामगारांचे नाव आहे .
याप्रकरणी रोड रोलर चालकांवर निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. शनिवार सायंकाळी गंगानगर येथे रस्त्याचे काम सुरू होते तेथेच आकाश हे काम करीत होते. त्याचवेळी रोड रोलर चालकाने अचानक रोड रोलरला मागे घेतल्याने त्याच्या चाकाखाली आकाश सापडले यामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला.

