तडीपार आदेशाचा भंग ; गुन्हेगारास अटक!

पिंपरी : दोन वर्षाकरिता पिंपरी चिंचवड आयुक्तालय , पुणे शहर, पुणे ग्रामीण हद्दीतून तडीपार असताना कोणतीही परवानगी न घेता आळंदी पोलीस स्टेशनच्या हद्दीत वास्तव्यास राहिल्याने आळंदी पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे, ही घटना 15 डिसेंबर 2025 रोजी रात्री 9: 30 च्या सुमारास इंद्रायणी नदी घाट ,आळंदी ता. खेड येथे घडली .सचिन विष्णू सातपुते पोलीस शिपाई, आळंदी पोलीस स्टेशन यांनी फिर्याद दिली आहे.
केतन प्रकाश शिंदे (वय 22, नगरपरिषद जवळील झोपडपट्टी, आळंदी, ता. खेड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार केतन शिंदे या गुन्हेगारास पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय, पुणे शहर व ग्रामीण भागातून 18 नोव्हेंबर 2025 मध्ये दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे. आरोपी तडीपार असताना देखील कोणतीही परवानगी न घेता आळंदी पोलीस स्टेशनच्या हद्दीत मिळून आला. त्याने एक लोखंडी कोयता बेकायदेशीर पणे बाळगला. मनाई आदेशाचा भंग केल्याने गुन्हा दाखल झाला आहे.

प्रतिबंधित परदेशी बनावटीच्या इ- सिगारेट जप्त ; गुन्हा दाखल
पिंपरी: शासनाने प्रतिबंधित केलेल्या परदेशी बनावटीच्या वेगवेगळ्या कंपनीच्या 85 हजार दोनशे रुपये किमतीच्या इ- सिगारेट, सिगारेट व तंबाखूजन्य हुक्का पार्लर फ्लेवर विक्रीकरिता बाळगल्याने संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात एका व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवार 16 डिसेंबर रोजी दुपारी पावणेदोनच्या सुमारास डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज जवळ, पु .ल देशपांडे उद्यान समोर, संत तुकाराम नगर, पिंपरी येथे घडली.
मितेश मोहन यादव पोलीस शिपाई ,अमली पदार्थ विरोधी पथक ,गुन्हे शाखा यांनी संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे .अहमद यासीन हमीद शेख (वय 35, रा. डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज जवळ ,पु .ल देशपांडे उद्यान समोर, संत तुकारामनगर )असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने वेगवेगळ्या कंपन्यांची सरकारने प्रतिबंध केलेल्या परदेशी बनावटीच्या ई-सिगारेट, सिगारेट व तंबाखूजन्य हुक्का फ्लेवर विक्री करिता साठा करून बाळगला असल्याने मिळून आला. आरोपीस अटक झाली नसून संत तुकाराम नगर पोलीस याबाबत पुढील तपास करत आहेत.

