तडीपार आदेशाचा भंग ; कोयत्यासह आरोपीस अटक!

पिंपरी : तडीपार आदेशाचा भंग करून बेकायदेशीरत्या पिंपरी चिंचवड शहरात हातात लोखंडी कोयता घेऊन दखलपात्र गुन्हा करण्याच्या उद्देशाने तडीपार गुंड पोलिसांना आढळून आला. ही कारवाई शनिवार सात मार्च रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास शंकर नगर, खदानी जवळ, चिंचवड येथे करण्यात आली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे .

याबाबत नंदलाल शिवाजी राऊत पोलीस शिपाई, पिंपरी पोलीस ठाणे यांनी फिर्याद दिली आहे. ऋषिकेश बाजीराव महानवर (वय 25, रा. गोकुळ हाउसिंग सोसायटी, सावता माळी मंदिर शेजारी, मोरे वस्ती, चिखली )असे अटक केलेल्या तडीपार गुंडाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी यास पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त परिमंडळ एक यांनी 23 ऑक्टोबर 2024 रोजी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय, पुणे शहर पोलीस आयुक्तालय व पुणे ग्रामीण पोलीस हद्दीतून दोन वर्षा करिता तडीपार केले आहे. तडीपारीची मुदत आणखी सात महिने बाकी असताना आरोपी पिंपरी चिंचवड आयुक्तालय हद्दीत मिळून आला आहे. त्याने कोणतीही परवानगी घेतली नाही. चार ते 17 मार्च पर्यंत कोणतेही घातक शस्त्र जवळ बाळगण्यास परवानगी नसताना आरोपीने स्वतःजवळ लोखंडी कोयता घेऊन दखलपात्र गुन्हा करण्याच्या उद्देशाने शंकर नगर, खदानी जवळ ,चिंचवड येथे पोलिसांना मिळून आला .पिंपरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस फौजदार शिंगाडे हे तपास करत आहेत.

