फक्त मुद्द्याचं!

19th April 2025
देश विदेश

प्रसिद्ध उद्योजक रतन टाटा कालवश

प्रसिद्ध उद्योजक रतन टाटा कालवश

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
मुंबई, प्रतिनिधी : ज्येष्ठ उद्योगपती आणि टाटा सन्सचे माजी चेअरमन रतन टाटा यांचे आज निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुंबईतील एका रुग्णालयात काही दिवसांपूर्वी त्यांना दाखल करण्यात आले होते. अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू होते. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी टाटा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

दोनच दिवसांपूर्वी रतन टाटा यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे वृत्त होते. मात्र, रतन टाटा यांनी स्वत: सोशल मीडियावर एक निवेदन जारी करत यासंदर्भात खुलासा केला होता. ही बातमी अफवा असल्याचे त्यांनी या निवेदनात म्हटलं होतं. तसेच प्रसारमाध्यमांनी चुकीची माहिती पसरवू नये, असं आवाहनही त्यांनी या निवेदनाद्वारे केलं होतं. याशिवाय “नेहमीच्या आरोग्य तपासण्यांसाठी मी रुग्णालयात दाखल झालो आहे”, असंही टाटा यांनी सांगितलं होते.

रतन टाटा यांचा जन्म २८ डिसेंबर १९३७ रोजी मुंबईत झाला. उद्योग जगतासह सामाजित क्षेत्रात त्यांनी मोठे काम केले आहे. रतन टाटा हे टाटा समूहाचे संस्थापक आणि जमशेटजी टाटा यांचे पणतू होत. १९९० ते २०१२ पर्यंत २२ वर्षे ते टाटा समूहाचे अध्यक्ष होते. तसेच ऑक्टोबर २०१६ ते फेब्रुवारी २०१७ दरम्यान, त्यांनी टाटा समूहाचे अंतरिम अध्यक्ष म्हणून कारभार पाहिला होता. रतन टाटा यांनी अनेक वर्षे टाटा समूहाच्या चॅरिटेबल ट्रस्टचे प्रमुख म्हणून कामकाज पाहिलं होतं.

टाटांच्या मार्गदर्शनाखाली २००८ मध्ये टाटा मोटर्सने टाटा नॅनो बाजारात आणली. त्यांनी २०२१ मध्ये टाटा सामूहाच्या चेअरमनपदाचा राजीनामा दिला आणि सायरस मेस्त्री यांच्याकडे पदभार दिला. मेस्त् यांच्याबरोबर झालेल्या वादानंतर २०१६ मध्ये पुन्हा वर्षभर टाटा समूहाच्या चेयरमनपदी ते आले. नटराजन चंद्रशेखरन हे सध्या टाटा समूहाचे चेअरमन आहेत. रतन टाटांच्या पश्चात धाकटे भाऊ जिम्मी टाटा, नोएल टाटा हे दोन भाऊ आहेत.

Written By
टीम फक्त मुद्याचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"