ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांच निधन

मुंबई : मराठी सिनेसृष्टीत चित्रपट, नाटक आणि मालिकांमधून प्रेक्षकांना खळखळून हसवणारे ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचं वयाच्या ६७ व्या वर्षी निधन झाले आहे. मागील काही दिवसांपासून ते कर्करोग या गंभीर आजाराशी झुंज देत होते. अखेर आज शनिवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. विजय कदम यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
विजय कदम यांनी अनेक मराठी सिनेमांत काम केलं आहे. त्यांनी हळद रुसली कुंकू हसलं, देखणी बायको नाम्याची, पोलीस लाईन, चष्मेबहाद्दर, सासू नंबरी जावई दस नंबरी, धुरंधर भातवडेकर या सिनेमातील त्यांच्या भूमिका प्रचंड गाजल्या. त्यांनी भिकाजीराव करोडपती, ती परत आलीये आणि शेजारी शेजारी पक्के शेजारी सारख्या मालिकेतही त्यांनी प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले.
दरम्यान, विजय कदम यांनी १९८० साली छोट्या भूमिकेतून सिनेमात पदार्पण केले. कर्करोगातं निदान झाल्यानंतर ते कित्येक वर्ष अभिनय क्षेत्रापासून दूर होते. कदम यांनी रंगभूमी सोबतच मराठी चित्रपटात देखील काम केलं होतं. ‘विच्छा माझी पुरी करट हे त्यांचं लोकनाट्य आणि ‘खुमखुमी’ हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर गाजले होते. या कार्यक्रमापासून त्यांची लोकप्रियता वाढत गेली. ‘रथचक्र’, ‘टुरटूर’ यांसारख्या नाटकांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली.