आरोपींवर मोका अंतर्गत कारवाई करावी वैष्णवीच्या वडिलांची मागणी!

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद
पिंपरी : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वैष्णवी हगवणे यांच्या वडिलांसोबत व्हिडिओ कॉल द्वारे संवाद साधला .भाजप नेते गिरीश महाजन हे वैष्णवी हगवण्यांच्या माहेरी सांत्वन करण्यासाठी गेले होते .तेव्हा त्यांनी वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांचे व्हिडिओ कॉल द्वारे बोलणे करून दिले .
यावेळी वैष्णवींच्या वडिलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आरोपींवर मोका अंतर्गत कारवाई करावी आणि विशेष सरकारी वकील म्हणून राजेश कावेडिया यांची नियुक्ती करण्याची विनंती केली आहे .त्यावर वकिला
संदर्भातील मागणी मुख्यमंत्र्यांनी लागलीच मान्य देखील केली आहे .वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणावरून आता सरकार अधिक गंभीर झाल्याचे पाहायला मिळत आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वैष्णवींच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील व्हिडिओ कॉल द्वारे वैष्णवीच्या वडिलांची संवाद साधून त्यांचे सांत्वन केले .सरकार आपल्या पाठीशी आहे असा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला.
वैष्णवी हगवणे यांच्या या प्रकरणावरून राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवार ,उद्योग मंत्री उदय सामंत, मंत्री गिरीश महाजन ,महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर अशा सर्वच पक्षांच्या राजकीय नेत्यांनी वैष्णवीच्या वडिलांचे प्रत्यक्ष भेटून सांत्वन केले आहे.