फक्त मुद्द्याचं!

18th June 2025
महाराष्ट्र

शिवाजी साटम यांना व्ही शांताराम पुरस्कार जीवनगौरव पुरस्कार जाहीर

शिवाजी साटम यांना व्ही शांताराम पुरस्कार जीवनगौरव पुरस्कार जाहीर

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
मुंबई, प्रतिनिधी : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने देण्यात येणारे पुरस्कर आज जाहीर झाले आहेत. चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार २०२३ जेष्ठ अभिनेता शिवाजी साटम यांना आणि स्व.राज कपूर जीवनगौरव पुरस्कार २०२३ जेष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना जाहीर झाले आहेत. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी एक्सवरून या संदर्भातील माहिती दिली आहे.

चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार २०२३ लेखक, दिग्दर्शक तसेच अभिनेता दिग्पाल लांजेकर यांना आणि स्व.राज कपूर विशेष योगदान पुरस्कार २०२३ जेष्ठ लेखक, दिग्दर्शक संकलक एन.चंद्रा यांना जाहीर करण्यात आला आहे.

ज्येष्ठ अभिनेता शिवाजी साटम यांनी आजवर मराठीसह बॉलीवूड कलाविश्वात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. ‘वास्तव’, ‘टॅक्सी नंबर 9211’, ‘चायना गेट’, ‘सूर्यवंशम’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या आहेत. याशिवाय त्यांची ‘सीआयडी’ ही हिंदी मालिका विशेष गाजली आहे.

सन २०२०च्या ५८ व्या राज्य चित्रपट महोत्सवाच्या अंतिम फेरीसाठी मी वसंतराव, फास, बापल्योक, गोष्ट एका पैठणीची, बीटर स्वीट, कडूगोड, जयंती, चोरीचा मामला, सुमी, फनरल, गोदाकाठ या दहा चित्रपटांना सर्वोत्कृष्ठ चित्रपटाच्या पारितोषिकासाठी नामांकन घोषित करण्यात आली आहेत. तसेच प्रथम पदार्पण चित्रपट निर्मिती आणि दिग्दर्शनाकरिता जून, जयंती, फनरल या तीन चित्रपटांची नामांकने घोषित केली गेली आहेत.

सन २०२१ सालाच्या ५९ व्या राज्य चित्रपट महोत्सवाच्या अंतिम फेरीसाठी तिचं शहर होणं, एकदा काय झालं, गोदावरी, फ्रेम, कारखानिंसांची वारी, इरगल, येरे येरे पावसा, बाल भारती, राख, बाईपण भारी देवा या दहा चित्रपटांची सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या पारितोषिकासाठी नामांकने जाहीर झाली असून प्रथम पदार्पण चित्रपट निर्मिती करीता जननी, लकडाऊन बी पॉझीटिव्ह, आता वेळ झाली आणि दिग्दर्शनाकरीता तिचं शहर होणं, फ्रेम, कुलूप या तीन चित्रपटांचे नामांकन जाहीर करण्यात आले आहे.

या सर्व पुरस्कार प्राप्त कलाकारांचे हार्दिक अभिनंदन करत राज्याचा सांस्कृतिक गौरव आपण सतत उंचावत राहावा आणि आई भवानीने तुम्हा सर्वांना उत्तम आरोग्य व उदंड यश द्यावे, अशा शुभेच्छा मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"