कर्जाची परतफेड न करता दमदाटी; एकाची गळफास घेऊन आत्महत्या!

पिंपरी : कर्ज घेऊन पैशाची परतफेड न करता दमदाटी केल्याने आणि मानसिक त्रास सहन न झाल्याने एका व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली. हे घटना सांगवीत उघडकीस आली .याप्रकरणी एका महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी महिला आणि त्यांचे पती यांच्याकडून आरोपीने 10 लाख रुपये उसने घेऊन दरमहा तीन टक्के व्याजाने परतफेड करण्याचे लेखी आश्वासन दिले होते .आरोपीने वर्षभर व्याज परत केले ,मात्र त्यानंतर व्याज व मुद्दलाची परतफेड न करता उलट पैसे मागितल्यावर धमकावले .या आर्थिक तणावामुळे फिर्यादीच्या पतीने 11 ऑक्टोबर 2025 रोजी राहत्या घरात सिलिंग फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानुसार 54 वर्षीय व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सांगवी पोलीस तपास करत आहेत.

