फक्त मुद्द्याचं!

27th February 2026
गुन्हेगारी

संसार मोडल्याच्या संशयावरून दोन महिलांवर कोयत्याने वार!

संसार मोडल्याच्या संशयावरून दोन महिलांवर कोयत्याने वार!

पिंपरी: संसार उध्वस्त केल्याच्या संशयावरून एका तरुणाने महिलेवर आणि तिला वाचवण्यासाठी आलेल्या तिच्या बहिणीवर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. ही घटना मंगळवार 24 फेब्रुवारी रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास जगतापनगर थेरगाव येथे घडली.

viara vcc
viara vcc

याबाबत उषा अतुल इंगवले यांनी काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी योगेश संतोष रणदिवे (रा. जगतापनगर, थेरगाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी योगेश यांचा असा गैरसमज होता की, फिर्यादीमुळे त्यांचा संसार मोडला आहे. याच रागातून त्याने फिर्यादीच्या डोक्यात आणि हातावर लोखंडी कोयत्याने वार केला. आरडाओरड ऐकून फिर्यादीची बहीण अशा बनसोडे बचावासाठी आली असता आरोपीने त्यांच्यावरही वार करून जखमी केले आणि तिथून पळ काढला. काळेवाडी पोलीस पुढील तपास करत आहे .

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"