फक्त मुद्द्याचं!

4th February 2026
गुन्हेगारी

गांजा विक्री प्रकरणी वेगवेगळ्या कारवाईत दोन व्यक्तींना अटक!

गांजा विक्री प्रकरणी वेगवेगळ्या कारवाईत दोन व्यक्तींना अटक!

पिंपरी: अवैधरित्या अमली पदार्थ गांजा विक्रीसाठी जवळ बाळगल्या प्रकरणी एका व्यक्तीस अटक करण्यात आली आहे . सुमारे 80 हजार 536 रुपये किमतीचा एक किलो 68 ग्रॅम वजनाचा गांजा ताब्यात घेण्यात आला. ही घटना आळंदी मरकळ रोडवरील, सटवाई माता मंदिराच्या पाठीमागे, मोकळ्या मैदानात बुधवार दिनांक 17 डिसेंबर रोजी साडेचार वाजण्याचे सुमारास घडली.

viara vcc
viara vcc

संजय मोहन जाधव पोलीस हवालदार, आळंदी पोलीस स्टेशन यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. लवकुश सुरेश (वय 35, रा..मरकळ रोड ,सोळू खिंड, ता. खेड, मूळ रा. सुरेश 97 फैजाबाद रोड दादरा, बाराबंकी, उत्तर प्रदेश) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना मिळालेल्या बातमीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. आरोपीने 80 हजार 536 किमतीचा एक किलो 68 ग्रॅम वजनाचा गांजा विक्रीसाठी जवळ बाळगल्याने ही कारवाई करण्यात आली.

68 हजार चारशे रुपये किमतीचा गांजा जप्त!
पिंपरी: अवैधरित्या अमली पदार्थ गांजा जवळ बाळगल्याने एका व्यक्तीस पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे .ही घटना मंगळवार 16 डिसेंबर रोजी सायंकाळी सव्वा सातच्या दरम्यान भाट नगर, कमानीजवळ, बिल्डींग नंबर पाच ,च्या समोर लिंक रोड ,पिंपरी येथे घडली.

विजय दीपक दौंडकर पोलीस हवालदार, अमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा ,पिंपरी चिंचवड यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अर्जुन शिवलाल परदेशी (वय 43, भाटनगर ,भाजी मंडई समोर ,येरवडा ,पुणे) असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी अर्जुन परदेशी याने अवैधरित्या 68 हजार चारशे रुपये किमतीचा एक किलो 360 ग्रॅम वजनाचा अमली पदार्थ गांजा विक्रीसाठी बाळगला. आरोपीने हा गांजा कोणाकडून आणला याबाबत त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने हा गांजा एका महिलेने विक्री करण्यासाठी दिला असल्याचे सांगितले .मात्र या महिलेचे नाव माहित नसल्याचे पोलिसांना सांगितले. याबाबत पिंपरी पोलीस पुढील तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"