फक्त मुद्द्याचं!

29th March 2026
महाराष्ट्र

प्रगत कृषी तंत्रज्ञान अभ्यास दौऱ्यासाठी शेतकऱ्यांना दोन लाखाचे अनुदान!

प्रगत कृषी तंत्रज्ञान अभ्यास दौऱ्यासाठी शेतकऱ्यांना दोन लाखाचे अनुदान!

मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना जागतिक स्तरावरील प्रगत कृषी तंत्रज्ञान प्रक्रिया उद्योग, बाजारपेठ विस्तार आणि उत्पादन वाढीच्या नवीन पद्धतीचे प्रत्यक्ष ज्ञान मिळावे, यासाठी राबवण्यात येणाऱ्या राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे या योजनेत बदल करण्यात आला असून आता या योजनेअंतर्गत प्रति शेतकरी दिल्या जाणाऱ्या अनुदानाची कमाल मर्यादा एक लाखावरून दोन लाख इतकी करण्यास मान्यता देण्यात आली असल्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले .

viara vcc
viara vcc

राज्यातील शेतकऱ्यांना जगातील देशांकडून आधुनिक शेती तंत्रज्ञान मिळावे यासाठी परदेशी अभ्यास दौऱ्याचे कृषी विभागामार्फत आयोजन केले जाते.ही योजना 2004-05 पासून कृषी विभागामार्फत राबविण्यात येत आहे . 2012 नंतरच्या काळात प्रवास निवास आणि परकीय चलनातील दरवाढ लक्षात घेता विद्यमान एक लाख रुपयांच्या मर्यादित शेतकऱ्यांना पुरेशी मदत मिळत नाही. त्यामुळे अनुदान दुप्पट करण्यात आले आहे. याबाबतचा शासन निर्णय कृषी विभागाकडून जाहीर करण्यात आला आहे .

राज्यातील शेतकरी योजनेअंतर्गत आतापर्यंत अमेरिका , इसराइल , जपान, ऑस्ट्रेलिया, नेदरलँड, फ्रान्स, थायलंड इत्यादी देशातील शेतीतील नवकल्पना, सिंचन तंत्र ,पीक उत्पादन व्यवस्थापन ,कृषी प्रक्रिया उद्योग मूल्यवर्धन आणि निर्यातक्षम शेती पद्धती याचा अभ्यास करून आलेले आहेत . कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार आता देशाबाहेर अभ्यास दौऱ्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रवास खर्चाच्या 50% किंवा कमाल दोन लाखापर्यंत अनुदान देण्यात येईल. तसेच प्रगत देशातील शेती पद्धतीचा अभ्यास करून आपल्या शेतीत राबवण्याची प्रेरणा मिळेल. या निर्णयाची अंमलबजावणी कृषी आयुक्तालय पुणे यांच्या माध्यमातून करण्यात येईल. योजनेअंतर्गत निवड प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी अर्जाची छाननी जिल्हा कृषी अधिकारी राज्यस्तरीय समित्या आणि कृषी आयुक्त कार्यालयाच्या माध्यमातून केली जाईल .

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"