मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत दोन लाख चार हजार बोगस लाभार्थी पुणे जिल्ह्यात!

पात्र महिलांची पुन्हा ई केवायसी द्वारे तपासणी केली जाणार
मुंबई : राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेत मोठा गैरव्यवहार उघडकीस आला आहे. सरकारने राबवलेल्या शोध मोहिमेत तब्बल 26 लाख 34 हजार बोगस लाभार्थी आढळले आहेत . पात्र नसतानाही दरमहा पंधराशे रुपयांचा निधी हे लाभार्थी घेत होते. त्यामुळे सरकारची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले आहे .राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात ही फसवणूक झाली असून पुणे जिल्ह्यात दोन लाख चार हजार बोगस लाभार्थी आढळले आहेत त्या पाठोपाठ नाशिक मध्ये एक लाख 86 हजार ठाणे एक लाख 25 हजार 300 बोगस लाभार्थी असल्याचे उघड झाले आहेत. सरकारकडून आता सर्व पात्र महिलांची पुन्हा ई केवायसी द्वारे तपासणी केली जाणार आहे

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत बोगस लाभार्थी आढळलेल्या जिल्ह्यामध्ये पुणे जिल्हा दोन लाख चार हजार , ठाणे एक लाख 25 हजार 300 , अहिल्यानगर एक लाख 25 हजार 756 ,नाशिक एक लाख 86 हजार 800 , छत्रपती संभाजी नगर एक लाख 4700 , कोल्हापूर एक लाख चौदाशे, मुंबई उपनगर एक लाख 13 हजार, नागपूर 95 हजार 500 , बीड 71 हजार , लातूर 69 हजार , सोलापूर एक लाख चार हजार , सातारा 86000 , सांगली 90 हजार, पालघर 72 हजार , नांदेड ९२ ००० , जालना 73000 , धुळे 75000 आणि अमरावतीत 61 हजार बोगस लाभार्थी उघडकीस आले आहेत.
या योजनेमध्ये एकूण 2 कोटी 63 लाख महिलांनी नोंदणी केली होती . त्यापैकी दोन कोटी 41 लाख महिला पात्र ठरल्या . विधानसभा निवडणुकीनंतर शिल्लक राहिलेल्या अकरा लाख अर्जाची तपासणी केल्यानंतर सात लाख 76 हजार अर्ज अपात्र ठरले. जून महिन्यात सरकारने या योजनेचा सखोल आढावा घेण्याचे ठरवले असून महिला व बालकल्याण विभागाने सर्व विभागाकडून माहिती मागवल्यानंतर फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे