फक्त मुद्द्याचं!

15th March 2026
गुन्हेगारी

कंपनीची सीमा भिंत अंगावर पडून दोन मजुरांचा मृत्यू;एकास अटक

कंपनीची सीमा भिंत अंगावर पडून दोन मजुरांचा मृत्यू;एकास अटक

पिंपरी: सुमा इंडेक्स थर्मल कंपनीच्या शेड मधील सीमा भिंतीचे प्लास्टर चे काम सुरू असताना जेसीबीचा धक्का लागून भिंत अंगावर कोसळल्याने दोन कामगारांचा मृत्यू झाला .ही घटना शुक्रवार 13 मार्च 2026 रोजी सायंकाळी साडेचार च्या सुमारास सुमा इंडक्शन थर्मल कंपनी, ज्योतिबा नगर, तळवडे ,ता. हवेली येथे घडली. याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे.

viara vcc
viara vcc

याबाबत मनोहर भिकू चव्हाण (वय 36, सध्या रा. धाकडे आळी, दत्त मंदिराजवळ चाकण, ता खेड) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. दीपक देवाजी जाधव (वय 36 ,रा. खराबवाडी, चाकण, ता. खेड) या आरोपीस अटक करण्यात आली. सदाशिव आगळे (वय 45, रा. भोसरी), जेसीबी चालक (पूर्ण नाव पत्ता माहीत नाही) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुमा इंडक्शन थर्मल कंपनीच्या शेड मधील 15 फूट खोली, 27 फूट लांबी, 11 फूट रुंदी असा खड्डा खोदण्यात आला होता. त्या खड्ड्याभोवती 15 इंच जाडीची विटाची भिंत बांधून प्लास्टर करण्याचे काम सुरु असताना या भिंतीला जेसीबीचा धक्का लागून ती भिंत कामगारांच्या अंगावर पडली. यामध्ये सचिन प्रकाश राठोड (वय 30 ),कोमल सचिन राठोड (वय 25) व फिर्यादी असे तिघेजण ढिगार्‍याखाली अडकून पडले. यामध्ये सचिन राठोड, कोमल सचिन राठोड हे गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. फिर्यादी यांच्या पाठीला, हाताला व पायाला गंभीर जखमा झाल्या आहेत.

प्लास्टरचे काम करीत असताना लेबर कॉन्ट्रॅक्टर यांनी कामगारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारी घेतली नाही. खड्ड्यामध्ये चढण्या उतरण्यासाठी शिडीचा देखील वापर करण्यात आला नाही. कामगारांना सेफ्टी जॅकेट, हेल्मेट, शूज न पुरवता काम करण्यास लावले. देहूरोड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक वाघमारे पुढील तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"