फक्त मुद्द्याचं!

17th March 2026
गुन्हेगारी

चिखली संविधान चौकात अपघात! एकास अटक

चिखली संविधान चौकात अपघात! एकास अटक

पिंपरी : दुचाकी स्वराला ट्रकने जोरदार धडेेेक दिल्याने दुचाकीस्वराचा मृत्यू झाला. ही घटना शनिवार 14 मार्च रोजी रात्री सव्वा दहाच्या सुमारास संविधान चौकाच्या जवळ त्रिवेणी नगर ते संविधान चौक जाणाऱ्या रस्त्यावर घडली. याबाबत एका महिलेने चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे

viara vcc
viara vcc

जितेंद्रराम संजीवन पटेल (वय 35, इंदोरी, बायपास पार्किंग, तळेगाव, एमआयडीसी, ता. मावळ, मुळगाव- पश्चिम टोला, पोस्ट खजुरीताल, इटमासतना खजुरी ताल, मध्य प्रदेश) असे अटक आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांचे पती रवींद्र पांडुरंग सांगळे (वय 50) हे त्यांच्या शाईन मोटरसायकल नंबर एम. एच.08/ ए डब्ल्यू/ 29 63 वरून जात असताना संविधान चौक चिखली येथे भरधाव ट्रक नंबर एम. एच. 12/ एफ झेड /37 97 चालकाने दुचाकी स्वराला जोरदार धडक दिली. या धडकेत फिर्यादीचे पती रवींद्र सांगळे यांचा मृत्यू झाला. चिखली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक देवकर हे तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"