दोन मित्रांनी केली आत्महत्या!

भोसरी : मोशी येथील भारत माता चौकाजवळील खि्रीड वस्ती येथे लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन दोन मित्रांनी आत्महत्या केली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे .
पोलीस पोलीस उपायुक्त शिवाजी पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार एमआयडीसी भोसरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत भारत माता चौकाजवळील खि्रीड वस्ती मोशी या ठिकाणी एका लिंबाच्या झाडाच्या एकाच फांदीला दोन जणांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्या करणाऱ्या तरुणांमध्ये तुषार अशोक ढगे (वय 25 राहणार हुंडा पिंपळगाव, तालुका जामखेड, अहिल्यानगर) सिकंदर सल्लाउद्दीन शेख (वय 30 रा. हुंडा पिंपळगाव, तालुका जामखेड, अहिल्यानगर) अशी गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या तरुणांची नावे आहेत. प्राथमिक माहितीनुसार हे दोघे एकमेकांचे मित्र असून काल मूळ गावावरून पुण्यात आले होते. परंतु कोणत्या कारणामुळे दोघांनी आत्महत्या केली याची माहिती मिळाली नसून भोसरी पोलीस याचा अधिक तपास करीत आहेत.