आदेशाचा भंग करून पिस्तूल जवळ बाळगल्याने दोघांना अटक!

बावधन : अवैधरित्या आदेशाचा भंग करून दोन व्यक्तींकडे दोन देशी बनावटीचे पिस्तूल मिळून आल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे. ही घटना बुधवार 24 डिसेंबर रोजी रात्री साडेआठ वाजण्याचे सुमारास तलाठी ऑफिस जवळ मोकळ्या मैदानात बावधन, ता. मुळशी येथे घडली.

याप्रकरणी अरुण पांडुरंग नरळे पोलीस हवालदार ,बावधन पोलीस ठाणे यांनी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ओंकार उर्फ चिक्या राजू जगताप (वय 19, लेन नंबर 7, मामासाहेब मोहोळ शाळेजवळ, विठ्ठल नगर ,वारजे माळवाडी आणि राम सुरेश वाघमारे (वय 23, रा. राजयोग सोसायटी, गणपती मंदिरामागे वारजे, माळवाडी )अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत .पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवार 24 डिसेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास पिस्तूल जवळ बाळगणारे दोघेजण तलाठी ऑफिस जवळ मोकळ्या मैदानात बावधन येथे येणार असल्याचे समजल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
आरोपी एक व दोन यांच्याकडे प्रत्येकी एक देशी बनावटीचे प्रत्येकी 50 हजार रुपये किमतीचे असे एकूण एक लाख रुपये किमतीचे पिस्तूल असल्याचे त्यांच्या झडतीमध्ये दिसून आले. याशिवाय दोन जिवंत काडतुसे देखील मिळून आली. ती जप्त करण्यात आली. याशिवाय पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये कोणतेही शस्त्र, चाकू ,सुरा ,कोयता ,दंड, काठ्या जवळ बाळगू नयेत असा आदेश असताना या आदेशाचा भंग केला. याबाबत बावधन पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. डोंगरे हे पुढील तपास करत आहेत.

