फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
गुन्हेगारी

दोन कारवायांमध्ये गांजा विक्री प्रकरणी दोघांना अटक!

दोन कारवायांमध्ये गांजा विक्री प्रकरणी दोघांना अटक!

एक किलो गांजा जप्त
पिंपरी : भोसरी आणि संत तुकाराम नगर येथे पोलिसांनी दोन वेगवेगळ्या कारवाया करत गांजा विक्री करणाऱ्या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून ९७४ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. दोन्ही कारवायांमध्ये तिघांवर गुन्हा दाखल करत दोघांना अटक करण्यात आली आहे.

भोसरी परिसरात पुणे-नाशिक महामार्गावर एका ५१ वर्षीय महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले. तिच्याकडून २० हजार ७०० रुपये किमतीचा ४१४ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला आहे. ५१ वर्षीय महिलेला अटक करत तिच्यासह आणखी एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसरी कारवाई संत तुकाराम नगर पिंपरी येथे करण्यात आली. विजय लक्ष्मण साळुंखे ( वय २१, भोसरी) याला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून ५६० ग्रॅम गांजा आणि ८०० रुपये रोख रक्कम असा एकूण २८ हजार ५०० रुपये किमतीचा ऐवज जप्त केला आहे. विजय हा संत तुकाराम नगर येथे गांजा विक्रीसाठी आला असता ही कारवाई करण्यात आली.

viarasmall
viarasmall

डेबिट कार्डची माहिती घेऊन सव्वा लाखांची फसवणूक!
पिंपरी : एका व्यक्तीचे डेबिट कार्ड एटीएममध्ये अडकल्यानंतर मदतीच्या बहाण्याने बँक खात्याची माहिती मिळविली. एक लाख २४ हजार ५०० रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली. ही घटना १५ एप्रिल रोजी सकाळी पावणे नऊ वाजताच्‍या सुमारास नखातेवस्‍ती, रहाटणी येथे घडली.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, काळेवाडी पोलिस ठाण्‍यात याबाबत एका ४७ वर्षीय व्यक्तीने गुरुवारी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एटीएममध्‍ये गेलेल्‍या एका व्यक्तीचे डेबिट कार्ड मशिनमध्‍ये अडकले. त्यानंतर त्यांनी एका हेल्पलाईन क्रमांकावर फोन केला. फोनवरील व्यक्तीने फिर्यादीस एटीएम मशीनवर काही बटणे दाबण्यास सांगून त्याआधारे फिर्यादी यांच्या बँक खात्याची माहिती घेतली. त्याद्वारे फिर्यादी यांच्या बँक खात्यातून एक लाख २४ हजार ५०० रुपये काढून घेत फसवणूक केली.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"