फक्त मुद्द्याचं!

3rd April 2026
गुन्हेगारी

2 कोटींच्या फसवणुक प्रकरणी तीन तीन सराईत गुन्हेगारांना अटक!

2 कोटींच्या फसवणुक प्रकरणी तीन तीन सराईत गुन्हेगारांना अटक!

सायबर पोलिसांचे मोठे यश
पिंपरी : बँकॉक व म्यानमार येथे सायबर फसवणुकीचे कॉल सेंटरमध्ये काम केलेल्या पश्चिम बंगाल व पंजाब येथील व्यक्तींना आणि नवी मुंबई येथील अकाउंट धारकासह तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. या आरोपींनी एका व्यक्तीची 2 कोटी नऊ लाख तीस हजार 537 रुपयांची ऑनलाइन पद्धतीने गुंतवणुकीच्या बहाण्याने फसवणूक केली होती. पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांनी तपास केला असून तीन आरोपींना अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त गुन्हे डॉ. शिवाजी पवार यांनी दिली.

viara vcc
viara vcc

बँकॉक व म्यानमार येथे सायबर फसवणुकीचे कॉल सेंटरमध्ये काम
या गुन्ह्यामध्ये आरोपी नंबर एक सुशील भगवान जुवाटकर (वय 42, नेरूळ वेस्ट, नवी मुंबई) ,2) पंकज राज कपूर (वय 38, सध्या राहणार नेरूळ, नवी मुंबई, मूळ गाव- जालंधर , पंजाब), 3) निश्चल टंकबीर बरेयली (वय 27, सध्या- रा. नेरूळ ,नवी मुंबई, मुळगाव- जि. दार्जिलिंग ,पश्चिम बंगाल) यांना अटक करण्यात आली. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे सहा मोबाईल फोन, तीन पासपोर्ट, तीन पॉस मशीन ,दोन लॅपटॉप, दोन हार्ड डिक्स, दोन क्यू आर कोड स्कॅनर, बारा शिक्के, वेगवेगळ्या चोवीस बँकांचे अकाउंट ओपनिंग किट, पाच डेबिट कार्ड असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच फिर्यादी यांचे 62 लाख रुपये होल्ड करण्यात आले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी वेगवेगळ्या बँक खात्यावर फिर्यादी कडून पैसे घेतले होते. मुंबईतील सेंट्रल बँक ऑफ इंडिया या खाते क्रमांकाची माहिती घेता अकाउंटं हे आरशिल इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड या नावाने नवी मुंबई येथील असल्याची माहिती प्राप्त झाली. तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपास करून पोलीस उपनिरीक्षक प्रकाश कातकाडे व पथक यांना नवी मुंबई येथे तपासासाठी रवाना केले होते. पोलीस उपनिरीक्षक कातकाडे व पथकाने नवी मुंबई येथे जाऊन तुर्भे पोलीस ठाणे यांच्या मदतीने आरोपीचा शोध घेतला असता सुशील भगवान जुवाटकर हा तपासात निष्पन्न झाला. या आरोपीला ताब्यात घेऊन पोलिसांनी गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास केला असता त्याने सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये काढलेले अकाउंट हे त्याचे साथीदार पंकज राज कपूर व निश्चल टंकबीर बरेयली व इतर पाहिजे आरोपी यांच्यासह वापरले असल्याची कबुली दिली.

आरोपी जुवाटकर त्याचे साथीदारआरशिल इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पंकज राज कपूर व निश्चल टंकबीर बरेयली यांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले. या दोन्ही आरोपीकडे गुन्ह्याबाबत चौकशी केली असता त्यांनी बँकॉक व म्यानमार या देशात जाऊन सायबर फसवणूक करण्याकरिता वापरण्यात येणाऱ्या कॉल सेंटरमध्ये काम केले असल्याची माहिती दिली. त्यांनी आरोपी जुवाटकर यांच्या सांगणे वरून नवीन कॉल सेंटर चालू करण्यासाठी आले असल्याचे सांगितले.

ही कारवाई पोलीस उपायुक्त गुन्हे डॉ. शिवाजी पवार सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे, 1 डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवी किरण नाळे, पोलीस निरीक्षक वनिता धुमाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण स्वामी, पोलीस उपनिरीक्षक वैभव पाटील, पोलीस उपनिरीक्षक सागर पोमण ,पोलीस उपनिरीक्षक रोहित डोळस, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश कातकाडे, पोलीस उपनिरीक्षक विद्या पाटील, पोलिस अंमलदार दीपक भोसले, विनायक म्हसकर, हेमंत खरात, सुभाष पाटील, अतुल लोखंडे, मुकुंद वारे, किरण देवकर, श्रीकांत कबुले, विशाल निश्चित, सोपान बोधवड, नितेश बीचेवार, दिपाली चव्हाण, भाविका प्रधान सर्व सायबर पोलीस ठाणे यांच्या पथकाने केली आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"