बेकायदेशीरपणे पिस्तूल बाळगल्याप्रकरणी; तिघांना अटक!

गुन्हे शाखा युनिट दोनची कारवाई
पिंपरी : बेकायदेशीरपणे पिस्तूल बाळगल्याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट दोनने तिघांना अटक केली आहे .त्यांच्याकडून चार पिस्तूल आणि पाच काडतुशे जप्त केले आहेत. अटक केलेले आरोपी सराईत गुन्हेगार आहेत .ही कारवाई बोडकेवाडी फाटा हिंजवडी माण रोडवर करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सराईत गुन्हेगार बोडकेवाडी फाटा येथे पिस्तूल घेऊन येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली .त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून तिघांना ताब्यात घेतले .त्यांच्याकडून आठ लाख पाच हजार रुपये किमतीची चार पिस्तूले आणि पाच जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत .पोलिसांनी अटक केलेल्यांमध्ये प्रवीण गुंडेश्वर अंकुश (21 कात्रज पुणे) ,विकी दीपक चव्हाण ( 20 हिंजवडी फेस दोन) आणि रोहित फुलचंद भालशंकर ( 22 जाधव नगर वडगाव बुद्रुक पुणे) अशी आहेत. याप्रकरणी पोलीस शिपाई अमर राणे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हिंजवडी पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.

