फक्त मुद्द्याचं!

12th March 2026
गुन्हेगारी

पिस्टल जवळ बाळगल्याने तीन आरोपींना अटक!

पिस्टल जवळ बाळगल्याने तीन आरोपींना अटक!

तळेगाव : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात शस्त्र वापरणे बाबत मनाई आदेश असताना तीन आरोपींनी आपल्याजवळ तीन देशी पिस्टल व सहा जिवंत काडतुसे जवळ बाळगल्याने त्यांना अटक करण्यात आली. ही घटना मंगळवार 10 मार्च रोजी रात्री सव्वा नऊच्या सुमारास पुणे मुंबई हायवे, एन व्ही बिजनेस सेंटरच्या समोर ,सतीश कार्गो पार्किंग च्या कडेला, सोमाटणे फाटा येथे घडली.

viara vcc
viara vcc

या प्रकरणी हर्षद जयवंत कदम पोलीस शिपाई, मालमत्ता गुन्हे विरोधी पथक, गुन्हे शाखा यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सरदार अकबर सय्यद (वय 27, यशवंत नगर, समृद्धी सोसायटी, फ्लॅट नंबर ४०३, तळेगाव दाभाडे), विशाल नाना कुडेकर (वय 35, रा. अनावळे, पोस्ट. पाळू, ता. खेड), प्रशांत बाबुशा सोनवणे (वय 28, रा. अनावळे, पोस्ट. पाळू, ता. खेड )अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत शस्त्र बाळ वापरण्याबाबत मनाई आदेश असताना आदेशाचा भंग केला. त्यांच्या ताब्यात एक लाख 50 हजार रुपये किमतीचे तीन लोखंडी देशी पिस्टल व सहा हजार रुपये किमतीचे सहा जिवंत काडतुसे मिळून आली. कोणताही कायदेशीर परवाना नसताना अवैधरित्या शस्त्रजवळ बाळगले. तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बालवडकर हे तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"