फक्त मुद्द्याचं!

4th February 2026
गुन्हेगारी

चाकण व भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पिस्टल बाळगल्याने तीन आरोपी जेरबंद!

चाकण व भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पिस्टल बाळगल्याने तीन आरोपी जेरबंद!

पिंपरी : चाकण आणि भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन आरोपीकडे प्रत्येकी एक पिस्टल आणि मॅक्झिन मॅक्झिन विनापरवाना बाळगल्याने तीन आरोपींना अटक केली आहे .

viara vcc
viara vcc

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कडाचीवाडी गणपती मंदिराजवळ, चाकण- शिक्रापूर रोडवर पाच डिसेंबर रोजी साडेपाचच्या दरम्यान आरोपी वैभव सुरेश माने (वय 29 ,रा. दत्तनगर चिंचवड) व अल्बर्ट सायमन जोशेफ (वय 25 रा. मद्रास हॉटेलच्या बाजूला एम बी कॅम्प देहूरोड) यांनी 51 हजार पाचशे किमतीचे एक देशी बनावटीचे गावठीपिस्टल व एक जिवंत काडतुस विनापरवाना बेकायदेशीरपणे जवळ बाळगल्याने चाकण पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. याबाबत ज्ञानेश्वर शंकर गाडेकर पोलीस हवालदार गुन्हे शाखा युनिट 4 यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत चाकण पोलीस तपास करत आहेत.

 भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत देवकर वस्ती मोकळे मैदान येथे चार डिसेंबर रोजी रात्री सव्वा दहाच्या सुमारास अजय लक्ष्मण नखाते ( वय 23, रा. लक्ष्मी मंदिर कुरळी, ता. खेड) या आरोपीकडे पंचवीस हजार रुपये किमतीचे एक लोखंडी देशी बनावटीचे काळ्या रंगाचे पिस्टल व मॅगझींसह 1000 रुपये किमतीचे एक जिवंत काडतुस राऊंड अवैधरित्या विनापरवाना जवळ बाळगल्या प्रकरणी भोसरी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे .मारुती व्यंकटी जायभाय (भोसरी पोलीस ठाणे )यांनी फिर्याद दिली आहे .भोसरी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"