फक्त मुद्द्याचं!

16th June 2025
देश विदेश

कर्नाटकात दोन अपघातात १० मृत्यू

कर्नाटकात दोन अपघातात १० मृत्यू

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
बंगळुरू (वृत्तसंस्था) : कर्नाटकमध्ये आज (बुधवार) दोन वेगवेगळ्या अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला आहे, तर १९ जण जखमी झाले आहेत.

कर्नाटकात सावनूर – हुबळी रस्त्यावरून फळे नेणारा ट्रक जंगल परिसरात ५० फूट दरीत कोसळल्यामुळे एक अपघात झाला आहे. यात १० लोकांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तर अन्य ९ लोक जखमी झाले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली. या वाहनातील लोक येल्लापुरा नावाच्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या स्थानिक जत्रेत फळे घेऊन जात होती. पहाटे साडेपाचच्या सुमारास मागून ओव्हरटेक करणाऱ्या एका वाहनाला मार्ग मोकळा करून देण्यासाठी ट्रकचा चालक डावीकडे वळला आणि ट्रक दरीत कोसळला. उत्तर कन्नडचे पोलिस अधीक्षक एम नारायण यांनी पीटीआयला ही माहिती दिली. जखमींना हुबळीच्या किम्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

कर्नाटकात रायचूरमध्येही भीषण अपघात झाला आहे. अपघातात तीन विद्यार्थ्यांसह चौघांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये गाडी चालकाचा समावेश आहे. तर अपघातात १० जण जखमी झाले आहेत. मंत्रालय संस्कृत पाठशाळेचे हे विद्यार्थी होते. हम्पी येथे तीर्थयात्रेसाठी चालले होते. नरहरी मंदिरात पूजा करून निघाले असता हा अपघात झाला.

Written By
टीम फक्त मुद्याचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"