फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
महाराष्ट्र

मविआचे नेते शपथविधीला जाणार?

मविआचे नेते शपथविधीला जाणार?

फक्त मु्द्द्याचं न्यूज नेटवर्क
मुंबई, प्रतिनिधी : मुंबईत आझाद मैदानावर आज संध्याकाळी होणाऱ्या शपथविधीची जैय्यत तयारी एकीकडे सुरू असताना, महाविकास आघाडीचे नेते शपथविधीला जाणार का, याची चर्चा राज्यभर आहे. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे २१ मुख्यमंत्री होणार आहेत.

महायुती सरकारचा शपथविधी सोहळ्यात आज देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे शपथ ग्रहण करतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. त्यासाठी आझाद मैदानावर भव्य तयारी करण्यात आली आहे. फडणवीस हे महाराष्ट्राचे २१ वे मुख्यमंत्री असतील.

कोणाकोणाला आहे आमंत्रण?
राजशिष्टाचारानुसार सर्व माजी मुख्यमंत्र्यांना या शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण पाठवण्यात आलं होतं. राजशिष्टाचार विभागाने माजी मुख्यमंत्री आणि राज्यातील सर्व पक्षांच्या प्रमुख नेते, अध्यक्ष, पक्षप्रमुखांना निमंत्रण पाठवलं होतं. यादरम्यान, उद्धव ठाकरे, शरद पवारांनाही निमंत्रण पाठवलं होतं. मात्र, शरद पवारांप्रमाणेच उद्धव ठाकरेही या सोहळ्याला उपस्थित नसतील. काँग्रेसच्या नेत्यांनाही निमंत्रण पाठवण्यात आलं होतं. नाना पटोलेंना निमंत्रण देण्यात आलं होतं. मात्र, महाविकास आघाडीतील कुठलेही बडे नेते या सोहळ्याला उपस्थित नसतील, अशी माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: शरद पवारांना फोन करत शपथविधीच्या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं. मात्र, शरद पवार सध्या दिल्लीत असल्याने ते शपथविधीला उपस्थित राहणार नाहीत. निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुतील एकमेकांच्या विरोधात लढले. यादरम्यान, दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर जोरदार टीका करण्यात आली होती. मात्र, आता निवडणूक संपल्यानंतर फडणवीसांनी राजकीय वैर बाजूला ठेवत शरद पवारांना फोन करुन शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण दिलं. मात्र, दिल्लीत संसदेचं अधिवेशन सुरु असल्याने शरद पवार दिल्लीत आहेत. त्यामुळे शरद पवार सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत.

Written By
टीम फक्त मुद्याचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"