दारु पिऊन आलेल्या दोघांनी युवतीवर केला अत्याचार!

रांजणगाव पोलिसांनी तात्काळ त्या दोन नराधम आरोपीच्या मुसक्या आवळल्या
शिरुर : स्वारगेट बस स्थानकात 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याची घटना ताजी असतानाच आता पुण्यातून आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. शिरुर तालुक्यात युवती आणि तिचा मामेभाऊ रात्रीच्या वेळेस गप्पा मारत असताना दारु पिऊन आलेल्या दोघांनी युवतीवर अत्याचार केलाय. ही घटना शिरुर तालुक्यातील कोरेगाव येथे घडलीये.
मामेभावासमोर तरुणीवर दोघांकडून आळीपाळीने अत्याचार
अधिकची माहिती अशी की, शिरुर तालुक्यात कारेगाव येथे एक युवती आणि तिचा मामेभाऊ रात्रीच्या वेळेस गप्पा मारत बसलेले असताना दारु पिऊन आलेल्या दोन व्यक्तींनी त्यांना चाकूचा धाक दाखवत लाथा बुक्क्यानी मारहाण केली. तसेच आळीपाळीने त्या युवतीवर बलात्कार करुन तिच्या अंगावरील सोनं काढून घेतल्याचा धक्कादायक प्रकार रांजणगाव एम आय डी सी पोलिस स्टेशन हद्दीमध्ये घडलाय. रांजणगाव पोलिसांनी तात्काळ त्या दोन नराधम आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. याबाबत अमोल नारायण पोटे (वय 25) आणि किशोर रामभाऊ काळे (वय 29) अशी अटक केलेल्या दोन आरोपीची नावे आहेत.