होळीनिमित्त आकुर्डी येथे `सबरंग`

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : साहित्य संगीत कला मंचच्या वतीने संस्थेच्या ३० वर्षेपूर्ती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून येत्या १४ मार्च रोजी सबरंग हा सांगितिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
आकुर्डी रेल्वे स्थानक येथील ग. दि. माडगूळकर सभागृहामध्ये सायंकाळी पाच वाजता हा कार्यक्रम होईल. त्यासाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही. या कार्यक्रमामध्ये धनश्री घैसास यांचे शास्त्रीय गायन होईल. त्यांना उमेश पुरोहित (हार्मोनिअम), विवेक भालेराव (तबला) साथ करतील. तसेच अझरुद्दिन शेख यांचे बासरी वादन होईल आणि त्यांना संतोष साळवे (तबला) साथ करतील. अधिकाधिक रसिकांनी या मैफलीचा आनंद घ्यावा असे आवाहन संस्थेचे प्रमुख राकेश श्रीवास्तव यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क – ९३७०१२०९५८