शहर विकासाचे ‘व्हिजन’ डोळ्यासमोर ठेवताना माजी सैनिकांचा आदर्श : आमदार महेश लांडगे

दिघीचा कायापालट केला म्हणून लांडगे यांना साथ
भोसरी : तन-मन धन अर्पण करत आपण देशाची सेवा बजावली. त्याचाच आदर्श डोळ्यासमोर ठेऊन या शहराला देखील सुजलाम् – सुफलाम् करणार आहे. शहर विकासाचे ‘व्हिजन’ डोळ्यासमोर ठेवताना माजी सैनिकांचा आदर्श मी समोर ठेवतो, असे आवाहन भाजपा आमदार महेश लांडगे यांनी केले.
देशसेवेसाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्या या शूरांचा ‘माजी सैनिक मेळावा’ दिघी येथे पार पडला. यावेळी माजी सैनिक विकास संघ दिघी अध्यक्ष नरेंद्र सिंह चौहान, माजी सैनिक पतसंस्थेचे अध्यक्ष आमसिद्ध भिसे, माजी नगरसेवक विकास डोळस, कमांडर नंदा, कॅप्टन सावंत, परिसरातील आजी-माजी सैनिक तसेच त्यांचे परिवारातील सदस्य उपस्थित होते. सुमारे पाचशेहून अधिक यावेळी माजी सैनिकांची उपस्थिती होती. यावेळी माजी सैनिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
माजी सैनिक म्हणून आम्हाला मिळणारा सन्मान , आम्ही ज्या ठिकाणी वास्तव्यला आहोत, त्या दिघी परिसराचा केलेला कायापालट आणि आमच्या बाबत नेहमीच आस्थेवाइकपणाने होणारी विचारपुस या सर्व गोष्टींमुळे आम्ही नेहमीच आमदार महेश लांडगे यांच्या पाठीशी आहोत. त्यामुळे आम्हाला जर कोणी आमदार महेश लांडगे यांच्याबाबत “हाऊ इज द जोश..?” असे विचारले तर ” हाई सर” एवढेच आमच्याकडून सांगितले जाते, असेही माजी सैनिक म्हणाले.देव-देश आणि धर्मासाठी पुढाकार घेणाऱ्या कोणत्याही व्यक्तीसाठी नतमस्तक व्हावे ही माझी भूमिका आहे.
माजी सैनिकांनी देशासाठी केलेल्या कामाची कुणाशीच तुलना होऊ शकत नाही. दिघीगाव आणि भारतमातेचे सुपुत्र ज्यांच्या त्याग, शौर्य आणि राष्ट्रभक्तीचा संबंध देशवासियांना सार्थ अभिमान आहे. देशसेवेसोबतच लोकशाही बळकट व्हावी याकरिता संबंध सैनिक बांधवांनी मला पाठिंबा दर्शवित शुभाशीर्वाद दिले याबद्दल त्यांचा हा आजन्म ऋणी आहे. – महेश लांडगे,आमदार ,भोसरी विधानसभा,