३७ वर्षांच्या आठवणींनी फुलले एच.ए. शाळेचे आवार

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : कामगारनगरीचे भूषण म्हणजे एच ए कंपनी होय. याच कंपनीच्या एच. ए. स्कूल मधील १९८७ च्या बॅचचे १२ वे ‘स्नेह संमेलन नुकतेच झाले. शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेतील विविध आठवणींना उजाळा दिला. विविध गुणदर्शनाचे कार्यक्रमही या वेळी झाले.
चिंचवड स्टेशन येथील या आंनद सोहळ्यात एच.ए. शाळेतील आठवणीत माजी विद्यार्थी रममाण झाले होते. मंदा कंद, अंजली रामायणी, शकिला बागवान, सुरेंद्र मोरे, सुनील पवार, महेश घोसाळकर, प्रकाश तेलंगी, केशव देशपांडे, महेंद्र उमराणी यांनी गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. शाळेच्या वेळेनुसार सकाळी ११ ला चंद्रकांत डुंबरे, प्रताप सावंत, उमेश सुरवाडे, युवराज फाळके, लिना कट्टी, राजश्री कलापुरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन केले. तर पोलिस निरीक्षक विजयकुमार तांबे, अभय पिंपळीकर, बापू गायकवाड, महेश बडवे, पूर्वा ओक, अर्चना माने, मेधा पानसे यांच्या हस्ते सरस्वती पूजन केले. तर शैलेश भावसार आणि राजेश चिट्टे यांनी गणेश वंदना सादर केली. दिवंगत मित्रांना श्रद्धांजली अर्पण केली.
मोहन बाबर म्हणाले, ‘एच. ए. शाळेतील माजी विद्यार्थी ३७ वर्षे कालावधीनंतर मोठ्या संख्येने एकत्रीत आले. एच.ए. शाळेला मदत करणे याच उद्देशाने एकत्रित भेटून चर्चा केली. मित्र -मैत्रीणींना येणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत असतो. शाळेविषयीची आपुलकी, कृतज्ञता आणि शाळेला मदत करण्याची भावना ठेवूनच अखंडितपणे काम करीत असतो.’ वाढते सायबर गुन्हे रोखणे त्यावरील उपाययोजना, आरोग्याची घ्यायची काळजी याविषयी अजीत गुजराथी, निलेश आल्हाट यांनी मार्गदर्शन केले.
दुपारच्या सत्रात विविध गुणदर्शन, नृत्य, खेळ तसेच मराठी, हिंदी चित्रपटातील गाणी गायन झाले. गायक शैलेश भावसार, राजेश चिट्टे, सुधीर भोसले, राहुल गुजर, उमाकांत सोनवणे, सुनील पवार, नितीन सावंत, तसेच गायिका निलाबंरी जाधव, अनिता कदम, मनिषा गवळी यांच्या गायनाने सर्वांना मंत्रमुग्ध केले. सुनील गाडगीळ यांनी आभार मानले.