फक्त मुद्द्याचं!

19th April 2025
विधानसभा २०२४

लघु उद्योजकांचे प्रश्न सोडवले म्हणून महेशदादांसोबत!

लघु उद्योजकांचे प्रश्न सोडवले म्हणून महेशदादांसोबत!

पिंपरी-चिंचवड लघुउद्योजक संघटनेचा आमदार महेश लांडगे यांना जाहीर पाठींबा

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : पिंपरी-चिंचवड शहरातील लघु उद्योजक संघटनेचे अध्यक्ष आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार महेश लांडगे यांना जाहीर पाठींबा दिला. संघटनेचे नोंदणीकृत सदस्य उद्योजक ४ हजार २०० हून अधिक आहेत. लघु उद्योजक आणि कामगार असा सुमारे ४० हजाराहून अधिक जनसमुदाय आमदार लांडगे यांच्या पाठीशी राहिले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत आमदार लांडगे यांची ताकद आणखी वाढली आहे.

भोसरी विधानसभा मतदार संघात भाजपा-शिवसेना- एनसीपी- आरपीआय- मित्र पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार महेश लांडगे यांना पिंपरी-चिंचवड लघुउद्योजक संघटनेकडून जाहीर पाठिंबा देण्यात आला. तसे लेखी पत्र संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी दिले आहे.

यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष संजय जगताप, विनोद नाणेकर, सचिव जयंत कड, सहसचिव प्रविण लोंढे, खजिनदार संजय ववले, प्रसिद्धीप्रमुख विजय खळदकर, संचालक संजय सातव, नवनाथ वायाळ, हर्षल थोरवे, विनोद मित्तल, प्रमोद राणे, भारत नरवडे, अतूल इनामदार, सचिन आदक आदी उपस्थित होते.

संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे म्हणाले की, उद्योजकांच्या आणि औद्योगिक क्षेत्राच्या समस्या सोडवण्यासाठी आणि पायाभूत सोयी-सुविधा सक्षम करण्यासाठी आमदार महेश लांडगे यांनी कायम पुढाकार घेतला आहे. राज्याचे उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांची दोनदा शहरात बैठक झाली होती. तसेच, मुंबईतही संघटनेच्या पदाधिकारी आणि उद्योगमंत्र्यांची बैठक झाली होती. उद्योजकांच्या समस्या सोडवण्याबाबत महायुती सरकार आणि आमदार महेश लांडगे सकारात्मक भूमिका घेतात. त्यामुळे पिंपरी-चिंचवड लघु उद्योजक संघटनेचे सर्व सभासद, पदाधिकरी, कर्मचारी महेश लांडगे यांना पाठिंबा देत आहेत.

या संदर्भात आमदार महेश लांडगे म्हणाले की, पिंपरी-चिंचवड उद्योगनगरी म्हणून ओळखली जाते. कामगार या शहराचा कणा आहे. त्यामुळे आगामी काळात उद्योग धंदे, व्यवसाय आणि स्टार्टअप्स क्षेत्राला पोषक वातावरण निर्माण करणार आहे. पायाभूत सोयी-सुविधा आणखी सक्षम करणार आहे. औद्योगिक पट्टयातील रस्ते, सुरक्षा, वीज पुरवठा, सांडपाणी व्यवस्था सक्षम करुन औद्योगिक कंपन्यांना प्रोत्साहन देणार आहे. नवीन उद्योग शहर व आसपासच्या परिसरात यावेत. या करिता केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार आहे. यातून रोजगार निर्मितीला चालना देता येईल, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

Written By
टीम फक्त मुद्याचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"