फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
देश विदेश

काश्मीरच्या खोऱ्यात येणार थंडीची लाट

काश्मीरच्या खोऱ्यात येणार थंडीची लाट

फक्त मु्द्द्याचं न्यूज नेटवर्क
श्रीनगर (वृत्तसंस्था) : काश्मीर खोऱ्यात रात्रीचे तापमान गोठणबिंदूच्या खाली स्थिरावले आहे आणि आता थोड्या विश्रांतीनंतर थंडीची तीव्रता आणखी वाढली आहे.

सध्या आकाश निरभ्र असल्याने रात्रीचे तापमान संपूर्ण खोऱ्यातील गोठणबिंदूच्या खाली गेले, असे हवामान खात्याने सांगितले.श्रीनगरमधील किमान तापमान उणे १ अंश सेल्सिअस नोंदवले गेले, जे आदल्या रात्रीच्या ०.९ अंशापेक्षा कमी होते. काश्मीरच्या खोऱ्यात तापमान शून्य अंश सेल्सिअसच्या खाली गेले आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, गुलमर्गमध्ये तापमान शून्य ते ९.८ अंश सेल्सिअस खाली राहिलं आहे. काल किमान तापमान उणे ६.६ अंश सेल्सिअस नोंदविले गेले होते. काश्मीर खोऱ्यात सर्वात कमी तापमान गुलमर्ग येथे होते. गुलमर्ग हे पर्यटन स्थळ आहे आणि पहलगाम हे अमरनाथ यात्रेचा बेस कॅम्प आहे. काजीगुंड येथे किमान तापमान उणे २.४ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे.

काश्मीर खोऱ्यात थंडीची लाट कायम राहणार
उत्तर काश्मीरच्या कुपवाडा किमान तापमान उणे २.१ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे. कोकेरनाग येथे तापमान १.९ अंश सेल्सिअस खाली आले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढचे काही दिवस हवामान कोरडे राहील असे म्हटले आहे. तापमानात घसरण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे आणि थंडीची लाट येण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

काश्मीरमध्ये सध्या चिल्लई-कला हा काळ सुरू आहे. या काळा खोऱ्यात सर्वाधिक थंडी पडत असते. २१ डिसेंबरपासून हा काळ सुरू झाला आहे. हा ४० दिवसांचा काळ ३० जानेवारी रोजी संपणार आहे. या काळात हिम वर्षाव होतो आणि तापमानात घसरण होत असते.

Written By
टीम फक्त मुद्याचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"