आयफोन १६ च्या खरेदीसाठी गर्दी

फक्त मु्द्द्याचं न्यूज नेटवर्क
मुंबई, प्रतिनिधी : भारतात आज २० सप्टेंबर रोजी बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित आयफोन १६ ची विक्री सुरू झाली आहे. आयफोनची क्रेझ असणाऱ्यांनी मुंबई, दिल्लीतील अॅपल स्टोअर बाहेर प्रचंड गर्दी केली होती.
काही दिवसांपूर्वीचं ऍपल कंपनीने आयफोन १६ बाजारात आणला आहे. भारतात त्याची विक्री आज सुरू झाली. कंपनीने ९ सप्टेंबर रोजी त्यांच्या ऍन्युएल इव्हेंट ‘इट्स ग्लोटाईम’मध्ये AI फिचर्स असलेली आयफोन १६ सीरिज लॉन्च केली होती. त्यानंतर शुक्रवारी आयफोन १६ भारतात दाखल झाला असून ऍपल स्टोअर्समध्ये विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. पण त्यापूर्वीच मध्यरात्रीपासूनच मुंबईतील बीकेसी येथील स्टोअरबाहेर ग्राहकांनी प्रचंड गर्दी केली असून लांबच लांब रांगा लागल्या आहेत. अशीच काहीशी गर्दी आयफोन १५ बाजारात आला तेव्हा लोकांनी केली होती. लोकांनी थेट गुजरातमधूनही या फोनसाठी मुंबई गाठले आहे.
आयफोन १६ फोनची किंमत ७९९ अमेरिकन डॉलर्स म्हणजेच साधारण ६७,००० रुपयांपासून पुढे आहे. तर, आयफोन १६ प्लसची किंमत ८९९ अमेरिकी डॉलर्स म्हणजेच साधारण ७५,५०० रुपये आहे. आयफोन १६ प्रो (१२८ जीबी) मॉडेलची किंमत ९९९ अमेरिकन डॉलर्स म्हणजेच ८३,८७० रुपये आहे. आयफोन १६ प्रो मॅक्स (२५६ जीबी) मॉडेलची किंमत ११९९ अमेरिकी डॉलर्स म्हणजेच साधारण एक लाख रुपये आहे. प्रत्येक देशात तेथील स्थानिक कर रचनेनुसार आयफोन १६ सिरीजच्या फोनची किंमत वेगवेगळी असणार आहे.