फक्त मुद्द्याचं!

12th March 2026
गुन्हेगारी

क्रिप्टो करन्सी मध्ये तीनशे टक्के परतावा देण्याचे आमीष ; 13 लाख 41 हजार रुपयांची फसवणूक!

क्रिप्टो करन्सी मध्ये तीनशे टक्के परतावा देण्याचे आमीष ; 13 लाख 41 हजार रुपयांची फसवणूक!

 पिंपरी : क्रिप्टो करन्सी मध्ये पैसे गुंतवणूक केल्यास तीनशे टक्के परतावा देण्याचे आमीष दाखवून 13 लाख 41 हजार रुपयांची फसवणूक केल्याची फिर्याद हिंजवडी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. ही घटना 18 नोव्हेंबर ते 21 नोव्हेंबर 2025 च्या दरम्यान (पुष्कर पांडे यांच्या भाडेचा फ्लॅट नंबर पंधराशे दोन, बिल्डिंग एफ, पार्क कनेक्ट सोसायटी, मारुंजी ,ता. मुळशी) येथे ही घटना घडली.

viara vcc
viara vcc

अश्रय बापूजी वाघ (वय 36 ))यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रोहन देशमुख (अज्ञात इसम वय पत्ता माहित नाही) असे आरोपीचे नाव आहे .पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादीला अज्ञात व्यक्तीने दिलेल्या टेलिग्राम ग्रुप टेलिग्राम वरून रोहन देशमुख यांनी फिर्यादीला क्रिस्टो करन्सी मध्ये गुंतवणूक केल्यास 300% परतावा देऊ असे आमीष दाखवून फिर्यादीचा विश्वास संपादन केला .पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने फिर्यादीला वेगवेगळी बँक खाते नंबर व यूपीआय आयडी देऊन त्यावर पैसे भरण्यास सांगितले. फिर्यादीने 13 लाख 41 हजार रुपये इतकी रक्कम भरली

त्यानंतर फिर्यादीला पैशाची आवश्यकता असल्याने आरोपी रोहन देशमुख यांचे टेलिग्राम खाते नंबर वर मेसेज करून सांगितले. आरोपीने फिर्यादीला सांगितले की तुमचे पैसे हे ट्रेडिंगच्या ॲप मध्ये अडकले असून तुम्हाला ते पैसे काढायचे असेल तर तुम्ही आणखी सात लाख रुपये द्या अशी मागणी केली. फिर्यादीने यावर माझ्या नफ्यातून ही रक्कम तुम्ही कापून घ्या असे सांगितल्यानंतर आरोपीने त्याच नकार दिला .त्यानंतर फिर्यादीची खात्री झाली की जास्त परतावा देण्याच्या बाहण्याने आपली फसवणूक झाली आहे .हिंजवडी पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल असून हिंजवडी पोलीस पुढील तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"