धुरंदर राजकारणी : मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस

अलीकडच्या कालखंडामध्ये राजकारणामध्ये अधिक बोलणे आणि कृतीशून्य हा गुण अधिक प्रमाणावर दिसून येतो. मात्र, कृतिशीलतेवर भर देणारे पिंपरी- चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील भाजपचे नेतृत्व म्हणजेच भोसरीचे आमदार महेश लांडगे होत. दहा वर्षांमध्ये भोसरीच्या नव्हे; तर पिंपरी- चिंचवडच्या विकासामध्ये योगदान देणार हे व्यक्तिमत्व आहे.
”असाध्य करत सायास, ” असा तुकोबारायांच्या वचनातील आशावाद त्यांच्यामध्ये दिसून येतो. जनतेच्या प्रश्नांसाठी प्रसंगी आक्रमक आणि सामान्यांचे अश्रू पुसणारा हळवा माणूस अशी दोन रूप अनेकदा पुढे आलेली आहेत. आक्रमक, हळवेपणा आणि कनवाळू वृत्ती असे जीवनाचे रंग त्यांच्यामध्ये अधिक ठळकपणे दिसून येतात.
गणेश मंडळ आणि क्रीडा संस्थेच्या माध्यमातून समाजकारणात आणि त्यानंतर राजकारणात प्रवेश करणाऱ्या महेश लांडगे यांनी पिंपरी चिंचवडच्या राजकीय पटलावर आपले स्वतःचे स्थान अधोरेखित केले आहे.
सन २००७ ते २०१२ या कालखंडामध्ये पिंपरी- चिंचवड महापालिकेत पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले. संधीचे सोन कसे करायचे ? हे दादाकडूनच शिकण्यासारखे आहे. अत्यंत कमी वयामध्ये त्यांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले, सर्वज्ञात आहे. मुळातच एक कुस्तीगीर आणि खेळाडू असल्याने प्रत्येक गोष्टीत त्यांचा खिलाडूपणा अधोरेखित होत असतो. कुस्तीचा पट कसा जिंकायचा याचे कसब वापरून त्यांनी राजकारणाचा आखाडा गाजविला आहे. महापालिकेतील त्यांचे नेतृत्व गुण बघून त्यांना विधी समिती सभापती आणि महापालिकेचे स्थायी समिती सभापती म्हणून सर्वोच्च स्थान मिळाले. या कालखंडात त्यांनी पिंपरी- चिंचवडच्या विकासासाठी बहुमोल असे योगदान दिले. महत्त्वकांक्षी प्रकल्प राबवले.
समाविष्ट गावातील विविध प्रश्न आणि विकासापासून वंचित राहिलेल्या गावांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांची भूमिका आग्रही राहिली. प्रसंगी आक्रमक झाले. स्वकियाविरोधत बंड पुकारले. प्रस्थापित राजकारण्यांविरोधात २०१३ च्या सुमारास एक वातावरण निर्माण झाले आणि त्यावेळेस महेशदादांनी भोसरीचे नेतृत्व करावे, असा आवाज बुलंद झाला आणि त्यातून २०१४ च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अपक्ष म्हणून महेश दादांना संधी मिळाली आणि गेल्या दहा वर्षांमध्ये महेशदादांनी जनतेच्या प्रश्नांसाठी आक्रमक राहून विविध प्रश्न सोडवण्यासाठी मदत केली आहे. जनतेच्या प्रश्नांसाठी त्यांनी भाजपला साथ दिली. २०१७ च्या महापालिका निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीतील १८ नगरसेवकांचा ग्रुप गट घेऊन ते भाजपात सामील झाले. राष्ट्रवादी अजित पवार गटाला त्यावेळी अक्षरशः घाम फुटला होता. आणि पंधरा वर्षे अजित पवारांची सुरू असणारी एकाधिकारशाही संपुष्टात आणली. राष्ट्रवादीचा गड उध्वस्त करून उध्वस्त करून भाजपचा झेंडा फडकावला.

महापालिकेचे सभागृह असो की, विधानसभेचे सभागृह या दोन्ही सभागृहांमध्ये कोणाचीही भिड भाड न ठेवता त्यांनी विविध प्रश्नांवर परखड मते मांडली आहेत. हिंदुत्ववादी विचारांवर चर्चा होत असताना महेशदादांनी आक्रमक होऊन थेट सपचे आमदार यांच्यावर केलेली चाल अजूनही महाराष्ट्र विसरलेला नाही. त्याचबरोबर बैलगाडा शर्यत, अनधिकृत बांधकामे निर्मिती करण, अशा विविध प्रश्नांवर सडेतोड मते मांडण्यास त्यांनी माघार घेतली नाही.
राजकारणामध्ये वाद प्रतिवाद टीका करण्याला अनेक लोक महत्त्व देतात. मात्र, काम करणे कमी बोलण्याने काम करणे हा महेश दादांचा पॅटर्न भोसरी विधानसभा मतदारसंघांमध्ये यशस्वी झाला आहे. राजकारण विरहित मैत्री जपली आहे. महापालिकेच्या सभागृहात असो की विधानसभेच्या सभागृहात असून ती जपली आहे. पक्षातीत मैत्री करणारा महेशदादा हे त्यांचे वेगळं रूपही अनेकांनी पाहिलेला आहे. पक्षाची भूमिका मांडताना ते पक्षाशी एकनिष्ठ असतात. मात्र, जनतेची भूमिका मांडताना आपल्या इतर पक्षातील सहकाऱ्यांनाही बरोबर घेऊन एकत्रितपणे आवाज उठवण्याचे काम करतात. मावळचे आमदार सुनील शेळके किंवा खेडचे आमदार दिलीप मोहिते, दौंडचे आमदार राहुल कुल, पुण्याचे आमदार सुनील टिंगरे अशा या तरुण-तडफदार आमदारांची मैत्री आणि एकी जनतेच्या प्रश्नांवरील सभागृहाने अनुभवलेली आहे.
आरोप करण्यामध्ये, आरोपांना प्रत्युत्तर देण्यामध्ये वेळ घालवण्यापेक्षा कृतीतून उत्तर देणे हा त्यांचा स्वभाव युवकांना भावनारा आहे. म्हणूनच धुरंदर राजकारणी म्हणून त्यांची ओळख आता पिंपरी चिंचवडला होऊ लागली आहे. मंत्री पदाचे दावेदार म्हणून महेश दादांच्या नावाची चर्चा राज्याच्या राजकारणात आणि भाजपत होत आहे.