मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून शरद पवार गटाच्या नेत्याला मारहाण…

परळी : विधानसभा निवडणुकीसाठी २८८ मतदारसंघात सकाळपासून मतदान सुरु आहे. पण काही ठिकाणी राडा झाल्याचं समोर आलेय. परळीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (पवार गट) यांच्यामध्ये संघर्ष पाहायला मिळाला.
परळी मतदारसंघात मतदार संघात शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्याला बेदम चोपल्याची घटना घडली आहे.
या घटनेनंतर आता धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांनी ही मारहाण केल्याचा आरोप होत आहे. कारण माराहाणीनंतर कार्यकर्त्यांनी धनंजय मुंडे यांच्या नावाच्या घोषणा दिल्या होत्या.या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे.बीडच्या परळी मतदार संघात बोगस मतदान होत असल्याची माहिती शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्याला मिळाली होती.यानंतर शरद पवार गटाचे नेते माधव जाधव हे परळी मतदार संघात बोगस मतदान रोखण्यासाठी गेले होते. मात्र माधव जाधव यांना मारहाण झाल्याची घटना घडली आहे. या संदर्भातला व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे.
परळीत मतदान केंद्राची तोडफोड, ईव्हीएम यंत्रही फोडले
नेमकं काय घडलं?माधव जाधव मूळचे घाटनांदूरचे आहेत. त्यांना मारहाण झाल्याचे पडसाद घाटनांदूरमध्ये उमटले. जाधव यांच्या कार्यकर्त्यांनी गावातील मतदान केंद्रात घुसून तोडफोड केली. त्यांच्याकडून मशीन फोडण्यात आली. त्यामुळे काही वेळ मतदान थांबवण्यात आलं. पोलिसांची मोठी कुमक गावात दाखल झाली. एसआरपीएफची तुकडी घाटनांदूरमध्ये तैनात करण्यात आली.