फक्त मुद्द्याचं!

19th February 2026
सांस्कृतिक

शिवसृष्टी येथे शाहिरीतून दुमदुमली छत्रपतींची पराक्रमगाथा!

शिवसृष्टी येथे शाहिरीतून दुमदुमली छत्रपतींची पराक्रमगाथा!

‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित पोवाडा’ कार्यक्रमा; थेरगाव डांगे चौक
पिंपरी : शिवजन्माची पावन पहाट… राजमाता जिजाऊंच्या संस्कारांची तेजस्वी छाया… तोरणा जिंकत स्वराज्याची रोवलेली पहिली मुहूर्तमेढ… लाल महालातील शौर्यगाथा… राज्याभिषेकाच्या सुवर्णक्षणाने साकारलेले हिंदवी स्वराज्य… असा शिवजन्मापासून राज्याभिषेकापर्यंतचा तेजस्वी प्रवास साकारत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अद्वितीय जीवनकार्याला शाहिरी पोवाड्यातून मानवंदना अर्पण करण्यात आली.

vcc 5
vcc 5

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, शौर्य, धैर्य आणि न्यायनिष्ठेचे प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अद्वितीय कार्याला आणि व्यापक विचारधारेला अभिवादन करण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने महापौर रवि लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, आयुक्त श्रावण हर्डीकर तसेच अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्व २०२६’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या पर्वात १७ फेब्रुवारी रोजी थेरगाव येथील डांगे चौक येथील शिवसृष्टी येथे “छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित पोवाडा” हा विशेष कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. शाहीर सुरेश सूर्यवंशी (आसंगीकर) यांनी सादर केलेल्या या कार्यक्रमाला नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. नगरसदस्य विश्वजित बारणे यांची विशेष उपस्थिती या कार्यक्रमाला होती. सोबतच महापालिकेचे विद्युत पर्यवेक्षक प्रमोद खराडे,करण तुपे यांच्यासह किशोर केदारी आदी उपस्थित होते.

शिवपूर्व इतिहासकाल, शिवजन्म सोहळा, स्वराज्यस्थापना ते शिवराज्याभिषेक असा सुरेल प्रवास शाहीर सुरेश सूर्यवंशी, शाहीर घनश्याम कुदळे,कांचनताई सूर्यवंशी, बालशाहीर विश्वजित सूर्यवंशी, बालशाहीर अथर्व गायकवाड, किबोर्ड वादक बापू बनसोडे, ढोलकी वादक राहुल सूर्यवंशी, झांझ वादक श्रेयस सूर्यवंशी आणि दादा गायकवाड या सर्वांनी दमदार सादरीकरणातून मांडला.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"